Immunity | इम्युनिटी वाढवणे आणि थकवा घालवण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ 5 आयर्नयुक्त फूड्स; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Immunity | काळेतिळ आयर्न, कॉपर, झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन बी 6, ई आणि फोलेटयुक्त असतात. 1 मोठा चमचा काळेतिळ (black sesame seeds) घ्या, ते कोरडे किंचित भाजून घ्या, यामध्ये एक चमचा मध आणि तूप मिसळून एक लाडू बनवा. आपला आयर्न (iron levels) चा स्तर वाढवण्यासाठी नियमितपणे हा पौष्टिक लाडू (Immunity) सेवन करा.

खजूर आणि मनुका (Dates and raisins) –
आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर आणि व्हिटॅमिन ए आणि सी मिळवण्यासाठी भरपूर सुकामेव्याचे सेवन करा. स्नॅक्स म्हणून 2-3 खजूर आणि एक मोठा चमचा मनुका खाऊ शकता. ताबडतोब उर्जा आणि आयर्नचा स्तर वाढवण्यासाठी हा चांगला नाश्ता (Immunity) आहे.

बीट आणि गाजर (Beets and carrots) –
या दोन्ही भाज्यांमध्ये आयर्नची मात्रा खुप जास्त असते. एका ब्लेंडरमध्ये एक कप उकडलेले बीट आणि गाजर टाका. ते चांगल्याप्रकारे मिसळा आणि ज्यूस काढून गाळून घ्या. एक चमचा लिंबू रस मिसळा आणि नियमित सेवन करा. लिंबू रस व्हिटॅमिन सी ची मात्रा वाढवतो आणि आयर्नचे शोषण वाढवतो.

व्हीट ग्रास (wheatgrass) –
हे बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन के, फोलिक अ‍ॅसिड, कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन आणि फायबर, व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोत आहे.
यामध्ये रक्त तयार करणारे अनेक गुण आहेत. 1 चमचा व्हीट ग्रास रोज सकाळी रिकाम्यापोटी घेतल्याने हिमोग्लोबिनमध्ये सुधारणा होते आणि इम्युनिटी वाढते.

शेवग्याची पाने –
शेवग्याची पाने आयर्न, व्हिटॅमिन ए, सी आणि मॅग्नेशियमचे पावरहाऊस आहे.
रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा शेवग्याच्या पानांची पावडर तुमचा आयर्नचा स्तर वाढवतात.

Web Title :- Immunity | add these 5 iron rich foods in your diet to boost immunity and deal with fatigue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FSSAI | ग्राहकांना खराब अन्न खाऊ घालणे रेस्टॉरंट, ढाबा चालकांना पडणार महागात ! 1 ऑक्टोबरपासून बिलावर 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमती उतरल्या; 10,200 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील मोठ्या बदलाने ग्राहक ‘खुश’, जाणून घ्या नवीन दर