Immunity Boost | मान्सूनमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी तुळस आणि काळीमिरी काढ्याचे करा सेवन, जाणून घ्या ‘हे’ 10 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Immunity Boost | पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. आर्द्रता आणि अस्वच्छतेमुळे इम्युनिटी कमी होते. याकाळात इम्युनिटी बूस्ट (Immunity Boost) करण्यासाठी तुळस आणि काळीमिरीचा काढा उपयोगी आहे. हा काढा तयार करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1. संसर्ग दूर राहतो.

2. जखम आणि सूजेची समस्या दूर होते.

3. इम्युनिटी वाढते.

4. तणाव दूर करतो, उर्जा वाढवतो.

5. खोकला, सर्दी आणि घशाची खवखव दूर होते.

6. बलगम आणि श्वसनाच्या समस्या दूर राहतात.

7. ब्रोंकायटिस आणि अस्थमात दिलासा मिळतो.

8. पचनशक्ती वाढते.

9. डायबिटीजमध्ये लाभदायक आहे.

10. थकवा दूर होतो.

तुळस आणि काळीमिरीचा काढा असा तयार करा

– साहित्य –
आले, लवंग 4-5, काळीमिरी 1 छोटा चमचा वाटलेली, तुळशीची ताजी पाने 5-6, मध एक छोटा चमचा, दालचिनी काडी

कृती –

1 – एक खोलगट भांड्यात पाणी उकळवत ठेवा.

2 – पाणी उकळल्यावर आले, लवंग, काळीमिरी आणि दालचिनी क्रश करा.

3 – नंतर सॉस पॅनमध्ये तुळशीच्या पानांसह सर्व वाटलेले साहित्य टाका.

4 – मध्य आचेवर जवळपास 20 मिनिटे मिश्रण निम्मे होईपर्यंत शिजवा.

5 – या मिश्रणात मध मिसळा आणि कोमट असतानाच सेवन करा.

Web Title :- immunity boost basil and black pepper decoction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण, जाणून घ्या मुख्य शहरातील सोन्याचा भाव

Twitter ची Congress च्या अनेक नेत्यांवर कारवाई, लॉक केले ऑफिशियल अकाऊंट; जाणून घ्या कारण

Pune Crime | भाड्याने लावतो असे सांगून परस्पर गाडी विकणाऱ्या दोघांना अटक