Immunity Boost करण्यासाठी प्या एलोवेराचा ज्यूस, सोबत होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आयुर्वेदात कोरपड म्हणजेच एलोवेराला खुप महत्व आहे. सौंदर्यासाठी याचा वापर केला जातो. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळते. ही इम्युनिटी मजबूत करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. सोबतच एलोवेरा ज्यूसच्या सेवनाने पोट, त्वचेसंबंधी समस्या दूर होतात. याचे फायदे जाणून घेवूयात…

1 इम्यूनिटी वाढते
एलोवेराचा ज्यूस सेवन केल्याने इम्यनिटी वाढते.

2 बद्धकोष्ठता दूर होते
या ज्युसमुळे पचनशक्ती सुधारते. यात अनेक एंजाइम आणि फायबर असल्याने बद्धकोष्ठतेवर उपयोगी आहे.

3 फॅट होईल कमी
एलोवेराचा ज्यूस सेवन केल्याने वजन कमी करण्यात मदत होते. कारण एलोवेरामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असते, जे फॅट कमी करण्यात मदत करते.

4 गाठींच्या वेदनेत उपयोगी
एलोवेराचा ज्यूस गाठीच्या वेदना दूर करण्यासाठी उपयोगी आहे. सोबतच हा ज्यूस शरीरातील वेदनांसह सूज कमी करण्यात सुद्धा सहायक आहे.