इम्यून पॉवर वाढवणे, व्हिटॅमिन आणि प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी ‘या 16 पदार्थांचे करा सेवन , सरकारने जारी केली लिस्ट; जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना काळात इम्यून सिस्टम मजबूत करून मोठ्याप्रमाणात व्हायरस आणि संसर्गापासून शरीर वाचवता येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर केंद्राने काही खाद्य पदार्थांची यादी जारी केली आहे जे रोज सेवन केल्याने इम्यून सिस्टम मजबूत बनवून आजाराशी सामाना केला जाऊ शकतो.

इम्यून सिस्टम वाढवणारे फूड्स
* धान्य प्रकारात नाचणी, ओट्स, राजगिरा
* प्रोटीनचे पदार्थ चिकन, फिश, अंडे, पनीर, सोयाबीन, नट्स आणि बीया
* हेल्दी फॅटसाठी अक्रोड, बदाम, ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल
* तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट आणि कोकोआ

या गोष्टी लक्षात ठेवा
* व्हिटॅमिन आणि मिनरल्ससाठी रंगीत फळे आणि भाज्यांचे पाच सर्व्हिंग
* रोज हळदीचे एक ग्लास दूध प्या
* रोज योग, ब्रिथिंग एक्सरसाइज आणि प्राणायाम करा
* चव आणि वासाची भावना कमी करण्यासाठी मऊ पदार्थ खा, जेवणात आमचूरचा वापर करा