Immunity Boosting Foods | रोगांना दूर करण्यासाठी ‘या’ गोष्टींचे सेवन करून वाढवा आपली रोग प्रतिकारशक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – औद्योगिक क्षेत्रामधील प्रगती वाढत चालली आहे. परंतू दुसरीकडे चिंतेची बाबही वाढत चालली आहे. (Immunity Boosting Foods) ती म्हणजे प्रदुषण. प्रदुषणामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. याच आजारांचा सामना करण्यासाठीआपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढली पाहिजे आणि वाढवण्यासाठी आपण पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे. (Immunity Boosting Foods) तर आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, कोणते पदार्थ किंवा गोष्टीं खाल्ल्याने आपणआपली रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतो (These Summer Foods Can Make Immunity Strong).

 

– हाईड्रेशन (Hydration)
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. दररोज किमान 3 लिटर पाणी प्यायला हवं. जेणेकरुन सर्व अवयव त्यांचे कार्य व्यवस्थित करू शकतील. (Immunity Boosting Foods) यासोबतच तुमचे शरीर संसर्गापासूनदूर राहून हायड्रेटेड राहते.

 

– प्रोबायोटिक (Probiotic)
दही (Curd), सॉकरक्रॉट (Sauerkraut), ताक (Buttermilk) इत्यादी गोष्टी आतडे निरोगी ठेवण्याचे काम करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

 

– आंबा (Mango)
फळांचा राजा आंबा, व्हिटॅमिन ए, सी आणि के (Vitamin-A, C And K) यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे सर्व पोषक द्रव्ये संक्रमणदूर ठेवण्यासाठी आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी कार्य करतात.

– सब्जा (Chia Seeds)
संशोधनानुसार, सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम (Calcium), मॅग्नेशियम (Magnesium) आणि लोह (Iron) सारखी आवश्यक खनिजे (Minerals) मिळतात. जी आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. ही सर्व खनिजेहाडांचे आरोग्य (Bone Health), स्नायूंचे कार्य (Muscle Function) आणि लाल रक्तपेशींच्या (Red Blood Cells) निर्मिती करतअसतात.

 

– खरबूज (Watermelon)
उन्हाळ्यात खरबूज हे सर्वात उपयुक्त फळ आहे. टरबूज, खरबूज इत्यादी सर्व फळे खरबूजाच्या कुटुंबातून येतात आणि ते शरीरालाभरपूर हायड्रेशन देण्याचे काम करतात. हे केवळ पोटासाठी हलकेच नाही तर आतड्यांच्या आरोग्यासाठी फायबर (Fiber) देखील प्रदानकरते. फायबर, व्हिटॅमिन-सी (Vitamin- C) आणि बी-6 (Vitamin- B6) ने समृद्ध मेलन विषाणूशी लढण्याचे काम करते.

 

– शारीरिक क्रिया (Physical Activity)
योग, ध्यान आणि व्यायामामुळे अस्वस्थता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. हे आनंद संप्रेरक ‘सेरोटोनिन’ सोडते. ज्यामुळेतुम्हाला बरे वाटते, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगजनकांना बाहेर काढून दाहक प्रतिक्रिया कमी होते.

 

– पुरेशी झोप (Enough Sleep)
संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, 7 ते 9 तास चांगली झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे वेळेत झोपले पाहिजे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Immunity Boosting Foods | Immunity Boosting Foods can make immunity strong against

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Nitin Deshmukh | राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना आमदाराच्या पत्नीनं केली पोलिसांत तक्रार

 

Eknath Shinde | पहिला ‘ठाकरी’ झटका ! एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवले

 

Eknath Shinde | गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी?; म्हणाले – ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…’