Immunity-Boosting Juice : काकडी आणि पालकांचा ज्यूस वाढवतो रोगप्रतिकारकशक्ती, जाणून घ्या रेसिपी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2020 हे वर्ष अनेक कारणांमुळे वाईट गेले. त्याच्यामागे कोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू मूळ कारण. त्यामुळे आपल्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. परंतु त्यामुळे एकच चांगली गोष्ट झाली लोकांना प्रतिकारशक्तीचे महत्त्व आणि त्याच्याविषयी माहिती समजली. दिवसेंदिवस अनहेल्दी लाइफस्टाइल अवलंबत होते त्यांच्यापर्यंत सुध्दा ही माहिती पोहचली.

इम्यूनिटीच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही अनेक नव्या पद्धतीच्या अन्न पदार्थांचा शोध केला आहे. ते प्रतिकार शक्ती वाढवू शकतात. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला ही माहिती करून घेतली पाहिजे की प्रतिकारशक्ती एकाएकी वाढत नाही. ती वाढण्याची एक प्रक्रिया आहे. तिला वेळ लागतो. आहार पद्धती आणि जीवन शैली मध्ये बदल करून आपण प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या विषाणू संक्रमणापासून वाचविण्याचे काम हे अन्नपदार्थ करू शकतात. व्हिटामिन आणि मिनरल्स यांनी भरपूर असलेल्या पालक आणि काकडीचा समावेश कुणी जर आपल्या आहारा मध्ये सामील करत असेल तर आपण आपली प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकेल.

पालक, काकडी असा पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. पालक पोटॅशियम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी, के, बी 2, बीसी आणि ई असे आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्स भरपूर आहेत. तसेच काकडी मध्ये ॲटी अक्सिडेंट गुण भरपूर असतात. त्यामुळे शरीराचा रोगांपासून बचाव होतो. काकडी आणि पालक केवळ पोषक तत्त्वांनीच भरपूर आहेत असे नाही तर अन्य काही गुणांनी सुद्धा युक्त आहेत. पालक आणि काकडी पासून सॅंडविच आणि सॅलड बनविणे ही सामान्य बाब आहे. परंतु स्वादिष्ट ग्रीन ज्यूस हे हे आणखीन चांगला आणि सहज पर्याय होऊ शकतो. फक्त ज्यूस काढणे सोपे आहे. परंतु त्यामध्ये घालून मिश्रण करतात ती पुदिन्याची पाने तसेच आंबट लिंबू आणि मसाले यांच्या विषयी विचार करताना यादी वाढू शकेल. जर आपल्याला हाइड्रेटिंग, पौष्टिक आणि स्वादिष्ट ज्युस हवा असेल तर आम्ही आपल्यासाठी एक पालक आणि काकडी पासून बनवलेल्या ग्रीन ज्यूसची शिफारस करतो. हा ज्यूस आपल्याला अधिक काळापर्यंत पोट भरलेले असल्याची जाणीव करून देतात तसेच प्रतिकारशक्ती सुद्धा मजबूत बनवू शकतात. लिंबू आणि आले त्याच्यामध्ये प्रतिकारक्षमता वाढविणारे घटक असतात. सर्दी तसेच संसर्ग यांच्यापासून लढण्यास मदत करतात. या ज्यूसची प्रक्रिया पद्धती घरांमध्ये जरूर अवलंबावी त्यामुळे आपले आरोग्य आणि प्रतिकारशक्ती मजबूत होईल.