WhatsApp मधून ‘डिलीट’ न करता ‘असा’ लपवा पर्सनल मॅसेज, कोणालाही दिसणार नाही ‘चॅट’

पोलीसनामा ऑनलाईन : व्हॉट्सअ‍ॅप हे भारतातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. तरुणांसोबतच आज सर्व वयोगटातील आणि गृहिणींपासून ते कार्यालय आणि व्यावसायिक गटांपर्यंतचे लोकही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपले काम करत आहेत. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने चॅटिंगला सुरक्षित करण्यासाठी फिंगरप्रिंट लॉक फीचर जारी केले आहे, ज्यात स्मार्टफोनप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याच्या फिंगरप्रिंटने उघडता येईल.

परंतु जर आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पा मारत असाल ज्यांचे चॅट्स आपण खासगी ठेवू इच्छिता, आणि चॅट्सही हटवू इच्छित नसाल तर असा एक खास मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमची वैयक्तिक चॅट डिलीट न करता व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वांपासून सुरक्षित ठेवू शकता. तसेच आपली वैयक्तिक चॅटिंग पाहिजे तेव्हा लपवू शकता आणि पाहिजे तेव्हा ओपन करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपवरील हे खास फिचर म्हणजे Archive. असे बरेच लोक आहेत ज्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरील हा पर्याय पाहिला कधीही वापरलेला नाही. जाणून घेऊया या फिचर संदर्भांत :

-व्हाट्सअ‍ॅप उघडा आणि चॅट्स वर जा.

-जे चॅट तुम्हाला वैयक्तिक ठेवायचे आहे, ते ओपन न करता, त्या चॅट बॉक्सला लॉग प्रेस करा.

-जेव्हा आपण चॅट बॉक्सवर लॉन्ग प्रेस केल्यावर, वरती एक आयकॉन फोल्डर दिसेल.

-या आयकॉनवर क्लिक केल्याने त्या संपर्कासाठी चॅट Archive होईल.

– त्यानंतर तो संपर्क चॅट लिस्टमधून गायब होईल, कितीही व्हॉट्सअ‍ॅप स्क्रोल केले तरी चालेल.

आयफोन वापरकर्त्यांनी हा स्वीकारला मार्ग :

आयफोनचा वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपमधील त्या संपर्कात जा आणि चॅट बॉक्सला उजवीकडे स्वाइप करा.

उजवीकडे स्वाइप केल्यानंतर More आणि Archive दिसेल, Archive क्लिक करा.

Archive केल्यानंतर लगेचच तो चॅट बॉक्स हिस्ट्रीतून नाहीसा होईल.

परत कसे आणावे :
Android वापरकर्ता –
जेव्हा आपल्याला पुन्हा त्या संपर्कासह चॅट करायचे असेल, तर Android वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर खाली स्क्रोल करा आणि सर्वात खाली जा.

शेवटच्या चॅटच्या खाली पहाल तर, शेवटी एक लहान Archive दिसेल.

त्यावर टॅप करा, आपण लपवलेला संपर्क दिसेल.

संपर्क चॅट बॉक्सला लॉन्ग प्रेस करा. Unarchive चे फोल्डर चिन्ह दिसेल.

या चिन्हावर क्लिक करून तो संपर्क आणि सर्व चॅट पुन्हा व्हॉट्सअॅपच्या यादीमध्ये दिसून येतील.

आयफोन वापरकर्ता

Android फोनमध्ये, जिथे संग्रहित फोल्डर तळाशी दिले गेले आहे, आयफोनमध्ये हे फोल्डर सर्वात वरती असेल.

विशेष म्हणजे, जेव्हा आपण व्हॉट्सअ‍ॅप उघडता तेव्हा हे फोल्डर दिसत नाही, जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप होम पेज खाली खेचल्यानंतर ते दिसून येईल.

या फोल्डरवर जा आणि लपविलेले गप्पा बॉक्स स्वाइप करा.

येथे More आणि Archive दिसेल. आयकॉनवर टॅप करून किंवा बॉक्स उजवीकडे स्वाइप करू करून Unarchive करू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/