तुमच्याकडं दुचाकी अन् चारचाकी आहे ? 31 मार्चपुर्वी आवश्य करा ‘हे’ काम, नाहीतर होईल नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसीला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. जर तुम्ही अजूनही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचं आवश्यक कागदपत्र नूतनीकरण (रिन्यू) नसेल केलं तर लवकर करून घ्या. नाहीतर ३१ मार्चनंतर दंड आकारण्यात येणार आहे. म्हणून तुम्ही आपली सगळी कागदपत्रे रिन्यू करून घ्या. कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी महामार्ग मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण कोरोनाच्या काळात देशातील सर्व शहरांच्या आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि फिटनेस सर्टिफिकेटची अनेक प्रकरणे प्रलंबित होती म्हणून महामार्ग मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णयानुसार ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या महत्त्वाच्या वाहन कागदपत्रांची नूतनीकरणाची तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

लायसन्स, वाहन नोंदणी, फिटनेस सर्टिफिकेट परमिट, परवाना, नोंदणी किंवा अन्य कागदपत्रांच्या नूतनीकरणाची तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय मोटार वाहन अधिनियम १९८८आणि केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या अंतर्गत घेण्यात आला आहे. अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सर्व संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता यापुढे वाढवली जाऊ शकत नाही किंवा देशव्यापी बंदमुळे मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि ज्या कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे, ती ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध मानली जातील असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

३१ मार्चनंतर नाही राहणार वैध
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३१ मार्चनंतर वाहनांची फिटनेस, परमिट, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांच्या वैधतेच्या निर्णयावर निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही अजूनही तुमची कागदपत्रे रिन्यू केले नसतील तर ते ३१ मार्चच्या अगोदर करून घ्या. अन्यथा ३१ मार्चनंतर ती कागदपत्रे वैध राहणार नाहीत.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणे आता खुप सोप्पे झाले आहे. कारण आता वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. कारण RTO शी संबंधित १८ सेवा आता ऑनलाईन झाल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून एक नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण सेवा डिजिटल करण्यात आल्या आहेत.नागरिकांना सोयीस्कर व त्रास-मुक्त सेवा देण्यासाठी, अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींच्या माध्यमातून नागरिकांना संपर्करहीत सेवा मिळण्यासाठी, आधार आवश्यक माहितीसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे.

‘या’ १८ सेवा झाल्या ऑनलाईन
या १८ सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (ज्यास ड्रायव्हिंग चाचणीची आवश्यकता नसते), डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, लायसन्स आणि वाहनांच्या आरसीमध्ये पत्ता बदलणे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट, परवान्यामधून वाहन श्रेणी सरेंडर करणं, तात्पुरते वाहन नोंदणी, मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी अर्ज यांचा समावेश आहे. आधार लिंक्ड व्हेरिफिकेशनद्वारे या ऑनलाईन सेवा देण्यात येतात.