कामाची गोष्ट ! आता तुम्ही SBI च्या ATM मधून 2000 ची नोट काढु शकणार नाहीत, जाणून घ्या

उन्नाव (उत्तर प्रदेश) : वृतसंस्था – एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही एसबीआयचं एटीएम वापरत असाल तर तुम्हाला आता एसबीआयच्या एटीएममधून 2000 रुपयांची नोट मिळणार नाही. मोठ्या नोटा एसबीआयच्या बँकेसोबतच आता एटीएममधूनही कमी होणार आहेत. आरबीआयने याबाबत संकेत दिले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या एटीएममधून मोठ्या नोटांची कॅसेट (बॉक्स) काढण्यास सुरुवात केली आहे.

उन्नाव जिल्ह्यात जवळपास सर्वच एटीएममधून कॅसेट काढण्यात आली आहे. आता तयारी 500 रुपयांच्या नोटेची आहे. आता एटीएममध्ये केवळ 100 आणि 200 रुपयांचीच नोट राहणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, छोट्या नोटांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आलं आहे.

उन्नाव स्टेट बँकेचे चीफ मॅनेजर सुनील कुमार म्हणाले, “जवळपास एका वर्षापासून 2000 रुपयांच्या नोटा एसबीआयच्या एटीएममध्ये टाकल्या जात नाहीत. आता एटीएम मीशनमध्ये 2000 च्या नोटा ठेवण्यासाठी लावलेल्या कॅसेट्स (बॉक्स) सध्या हटवण्यात येत आहेत. त्यामुळे इतर नोटा त्या ठिकाणी ठेवता येतील.”

Visit : Policenama.com