विखे पाटलांच्या पत्रकार परिषदेतील ‘हे’ आहेत महत्वाचे पाच मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे-पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार का ? यासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. मात्र त्याबाबत पहिल्यांदाच विखे पाटील माध्यमांशी बोलले आहेत. यावेळी त्यांनी पाच महत्वाच्या मुद्द्यावर माध्यमांशी बातचीत केली.

१) आघाडीत समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न

यावेळी बोलताना ते म्हणाले, मी असे ठरवलं होत की माध्यमात चाललेल्या उलट सुलट चर्चांनंतर याबाबत दोन दिवसात स्पष्टीकरण देऊ. मुलांसाठी संघर्ष केला असे वारंवार समोर यात होते, हे चुकीचे आहे. राज्यात कोणत्या जागा निवडून दिल्या जाऊ शकतात याबाबत राष्ट्रवादी सोबत अनेकवेळा आमची चर्चा झाली. नगरच्या जागेसाठी आम्ही देखील त्यांच्यासोबत चर्चा केली. सलग तीन वर्षे म्हणजेच २००४,२००९,२०१४ साली राष्ट्रवादी पराभूत झाली होती. पण या सगळ्यात योग्य तो समन्वय घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता.

२) पवारांच्या वक्तव्याची खंत

आम्ही एकीकडे आघाडीची चर्चा करीत होतो तेव्हा पवार साहेबांनी आमच्या वडिलांबाबतचे म्हणजेच बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबत केलेले विधान हे दुर्दैवी होते. आज ते हयात नाहीत अशा वेळेला जेव्हा एखादे जेष्ठ नेते त्यांच्याबाबत बोलतात तेव्हा ही गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. पवारांच्या वक्तव्याची आम्हाला खंत आहे. हे सर्व चालू असताना तिकडे सुजयच्या निर्णय झाला होता. आजोबांसंबंधी केल्या विधानामुळे सुजय देखील दुखावला गेला होता. त्यानंतर त्याने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

३) माझ्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेनंतर अंतिम निर्णय

यावेळी बोलताना विखे-पाटील म्हणाले,” गेल्या काही दिवसांपासून उलट सुलट चर्चा चालू आहेत. पण साध्याची परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे याची चर्चा मी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत येत्या दोन दिवसात करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

४) नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही

शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं, त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही. मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही,” असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ विखे पाटील सुजय यांच्याविरोधातही प्रचार करणार नाहीत.

५) बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही

बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत. असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केलं आहे. मुलाने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणे हा बालहट्ट आहे की काही निश्चित धोरण याबाबत स्ष्टीकरण द्या तसेच पक्षनिष्ठा सिद्ध करा , असे बाळासाहेब थोरात विखे पाटलांना म्हणाले होते.

ह्याहि बातम्या वाचा –

#Loksabha : उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार

‘सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय ? नेत्यांची मुलं म्हणून त्यांना उमेदवारी देणार का ?

भारिप बहुजन वंचित आघाडीत विलीन करणार ; काय असेल पुढील रणनीती ?

‘ मोदी कमजोर असून चीनला घाबरतात ‘

उत्सुक नसलेल्या ‘या’ उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा काँग्रेसचा घाट