इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाणे यांच्या मातोश्रींचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन म्हणजेच इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मगन ससाणे यांच्या मातोश्री स्मृतीशेष मैनाबाई गोविंद ससाणे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (१३ जुलै) निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अमरधाम स्मशानभूमी शिरूर ता. शिरूर, जिल्हा-पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

फुले -शाहू-आंबेडकर चळवळीच्या खंद्या समर्थक म्हणून ससाणे यांच्या मातोश्री ओळखल्या जात होत्या.
त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी युवाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. अनिलकुमार माने तसेच प्रदेशाध्यक्ष मा. बाळासाहेब मिसाळ पाटील सर उपस्थित होते. त्यांनी डॉ. ससाणे सरांचे सांत्वन केले. मैनाबाई ससाणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.