चीनी वस्तूंवर भारत सरकारने लावलेल्या प्रतिबंधांचा परिणाम, ‘स्मार्टफोन’ विक्रीत 30-40% ची घसरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनच्या वस्तूंवर भारत सरकारने लावलेल्या प्रतिबंधांचा परिणाम दिसू लागला आहे. यामुळे स्मार्टफोनच्या विक्रीत प्रत्येक आठवड्यात 30-40% ची घसरण झाली आहे. स्मार्टफोनची चांगली मागणी असताना आयात आणि निर्यातीमधील अडचणींमुळे विक्रीत घट झाली आहे.

माहितीनुसार, ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकाराने स्मार्टफोनच्या स्टॉकमध्ये कमतरता आली आहे. सध्या ही अडचण सुरूच राहणार आहे. एका मोठ्या एजन्सीने एप्रिल-जूनमध्ये मोबाइल फोनच्या विक्रीत मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. ही एजन्सी 1 कोटी 60 लाख स्मार्टफोनची आयात करते.

काऊंटर पॉईंटनुसार जुलैमध्ये संपर्ण महिनाभर स्मार्टफोनच्या सप्लायमध्ये अडचणी आहेत, कारण यांच्या पार्टची शिपिंग, असेंब्लिंग आणि डिस्ट्रीब्यूशनमध्ये अडथळे येत आहेत. कारण चीनकडून येणारा माल बंदरांमध्ये अडकून पडला आहे. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतरही मजूरींच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे सुद्धा उत्पादनावर परिणाम होत आहे.