योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्या, मुख्यमंत्र्यांचा निवडणूक कानमंत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील जास्तीत जास्त लोकांना थेट लाभ देणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याचा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून हा कानमंत्र आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी दिला आहे. सरकारने चार वर्षांत राबविलेल्या २०० लोकोपयोगी योजनांच्या आधारावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारीही भाजपने सुरू केल्याचे सुत्रांनी सांगितले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6835b71a-c074-11e8-8a3d-51e5656d7871′]

राज्यातील भाजप सरकारला ३१ ऑक्टोबरला चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर सहा महिन्यांत लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी आपापल्या विभागाच्या सर्वात प्रभावी ठरलेल्या पाच योजनांचे आणि खात्याच्या एकूण कामगिरीचे सादरीकरण करा, असा आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार विभागनिहाय आढाव्याची पहिली फेरी झाली आहे.

गणेश विसर्जनावेळी मरण पावलेल्यांची संख्या वाढली, २६ जणांनी गमावले प्राण

या पाहिल्या फेरीत सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, कृषी, मदत आणि पुनर्वसन, शिक्षण, ग्रामविकास, महिला बालकल्याण, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, वैद्यकीय शिक्षण, उद्योग आदी १०-१२ विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागाच्या सचिवांनी त्यांच्या विभागाच्या चांगल्या पाच योजनांचे आणि एकूणच विभागाच्या कामगिरीचे सादरीकरण केले. या वेळी संबंधित विभागाचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते. त्या वेळी आगामी निवडणुका लक्षात घेता योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

[amazon_link asins=’B0141EZMAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d8c5565-c075-11e8-97ec-7158ccb5dc10′]