अल्प काळात महिला व मुलांसाठी 20 उपक्रमांची अंमलबजावणी ! महिला व बाल कल्याण समितीच्या कार्याबाबत मी समाधानी – माधुरी सहस्त्रबुद्धे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये महिला, मुले आणि दिव्यांगांच्या उन्नतीसाठी 20 हून अधिक उपक्रम राबविले. पुर्वीपासून सामाजिक क्षेत्रात महिला आणि मुलांसाठी कार्य करत असल्याने विविध स्वंयसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्याने अल्प कार्यकाळातही विधायक उपक्रम राबवू शकल्याने मी समाधानी असल्याचे मत महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या मावळत्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, की कोरोनामुळे महिला व बाल कल्याण समितीची अध्यक्ष निवड १ ऑक्टोबरला झाली. यानंतर समितीच्या प्रत्येक बैठकीमध्ये किमान दोन उपक्रमांना चालना द्यायची असे ठरवून नियोजन केले. ‘बोला मनातले’ हा उपक्रम समुपदेशन उपक्रम, भन्नाट शाळा, महापालिका कर्मचार्‍यांसाठी व्यसनमुक्ती उपक्रम, कश्मिरी मुलींची क्रिकेट स्पर्धा, यूपीएससी व एमपीएससी पूर्व परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान, अनाथ मुलांना व्यावसायीक प्रशिक्षण, चाईल्ड लाईन या मुलांसाठी कार्य करणार्‍या संस्थेसाठी नळस्टॉप येथे कार्यालयाची उपलब्धता, १३३ हून अधिक मुला मुलिंना बेडवर असलेल्या लोकांची शुश्रूषा करायचे याचे प्रशिक्षण, घरटं प्रकल्पातील अनाथ मुलांसाठी कथाकथन कार्यक्रम, महिलांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही उपक्रम याचे व्हिडीओ तयार करून बचतगटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोचवले, नदी संवर्धनाबाबत लहान वयातच जनजागृती व्हावी यासाठी रामनदी काठावरील १२ शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, महिलांना उद्योजगता विकास, सुजाण पालकत्व हा उपक्रम राबविला. दिव्यांगासाठी उपक्रम, आशा वर्कर ची नेमणूक, घरटं व पाळणाघर व ग्रंथालयात काम करणार्‍या ना किमान वेतन मिळावे असा प्रस्ताव मंजूर करून घेतला.