निपाह व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जपान, ऑस्ट्रेलियाहून आैषधे आयात

बंगळरुः वृत्तसंस्था

केरळमध्ये अल्पावधीतच झपाट्याने पसरणाऱ्या निपाह व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याने जपान आणि आॅस्ट्रेलियामधून अाैषधे मागवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हायरसला रोखणाऱ्या काही चाचण्या आॅस्ट्रेलियात घेण्यात आल्या होत्या त्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही आैषधे कोझिकोडेमध्ये पोहचतील अशी माहिती आहे.

केरळच्या कोझिकोडेमध्ये निपाह व्हयारसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हयुमन मोनोक्लोनेल अॅटीबाॅडी एम 102.4 असे आॅस्टेलियाहून मागवण्यात आलेल्या आैषधाचे नाव आहे. सरुवातीला या आैषधाचे 500 डोस मागवण्यात आले आहेत. दरम्यान केरळमध्ये आत्तापर्यंत निपा व्हयरसने 18 जणांचा बळी घेतला आहे.

सध्या निपाह व्हायरसची दहशत संपूर्ण केरळ राज्यामध्ये बघायला मिळत आहे. या ठिकाणच्या वैद्यकिय विभागातर्फे पर्यटकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कोझिकोडे, मलाप्पुरम, वायनाड आणि कन्नूर या भागामध्ये प्रामुख्याने निपाह व्हायरसचा जास्त प्रभाव आहे. त्यामुळे या परिसरात जास्त सावधगिरी बाळगण्यात येत आहे.