‘कोरोना’च्या अनुषंगाने आता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्व प्रथिनयुक्त सिमला मिरची आणि पेरूचे महत्त्व घ्या जाणून

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या अनुषंगाने आता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यासाठी आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने ‘अ’,‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ ही जीवनसत्त्वे आणि आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनियम, फोलेटतेसह दर्जेदार प्रथिनयुक्त पदार्थ असले पाहिजेत, तर आज हे सर्व प्रथिनयुक्त असलेल्या सिमला मिरची आणि पेरूबाबत आपण जाणून घेणार आहोत.

सिमला मिरची

चांगल्या प्रतिकारशक्ती आवश्यक असलेलं ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व तसेच अँटिऑक्सिडेंट सिमला मिरचीत असतात. एक सिमला मिरची एका व्यक्तीच्या दिवसभराची ‘क’ जीवनसत्त्वाची गरज भागवू शकते. लाल आणि पिवळी सिमला मिरची अधिक पिकत असल्याने त्याच्यात हिरव्या मिरचीपेक्षा अधिक पोषक तत्त्वे असतात. म्हणून ‘क’ जीवनसत्त्वाचा खजिना असलेल्या सिमला मिरचीला आहारात प्राधान्य द्या.

>> सिमला मिरचीत फोलेट, पोटॅशिअम खजिनांसोबत आयर्न, ब६, ई आणि के ही जीवनसत्त्वे आढळून येतात.

>> ॲनिमियाला प्रतिबंध घालण्यासाठी सिमला मिरची उपयुक्त ठरते.

>> त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी आहारात सिमला मिरचीचा वापर करा.

>> डोळे आणि हाडांच्या आरोग्यासाठी सिमला मिरची चांगली आहे.

>> कर्करोग रोखण्यास तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी सिमला मिरचीचे सेवन करणे उपयुक्त ठरते.

पेरू

>> सिमला मिरचीप्रमाणे पेरूसुद्धा ‘क’ जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे. एका संत्रीपेक्षा जास्त एक पेरू ‘क’ जीवनसत्त्व पुरवतो.

>> पेरूत अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असून, तो प्रतिकारशक्ती वाढवून आजार संसर्गापासून आपले रक्षण करतो.

>> पेरूत ‘अ’ जीवनसत्त्व असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, तसेच पोटॅशियमचे प्रमाणही भरपूर असते.

>> रक्तदाब सामान्य ठेवण्याबरोबर हृदयाचे आरोग्य सुधारण्यातही पेरू महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

>> पेरूत असलेले फोलेट गर्भपणात आवश्यक असते.

>> रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पेरूचे सेवन लाभदायक ठरू शकते.

>> त्वचा निरोगी ठेवण्यासोबतच पेरू कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो.