गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते गणेश चतुर्थी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – भाद्रपद महिन्यातील पहिल्या चतुर्थीला गणपतीचा जन्मदिवस म्हणजेच गणेश चतुर्थीच्या नावाने ओळखले जाते. याच दिवशी माता पार्वतीच्या घरी त्यांचा लहान मुलगा म्हणजेच गणपतीचे आगमन झाले होते. यामुळेच संपूर्ण देशभरात ११ दिवस हा गणोशोत्सव साजरा केला जातो. या अकरा दिवसांदरम्यान गणपतीच्या १२ रूपांची पूजा केली जाते. यामुळे गणपती लवकर प्रसन्न होऊन भक्तांची सर्व विघ्न दूर करतो असे मानले जाते.

गणेश चतुर्थीचे महत्व
पुराणानुसार, शिवा, संज्ञा आणि सुधा या तीन चतुर्थी होत्या. यामधील भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला संज्ञा म्हटले जाते. यावेळी स्नान आणि उपवास केल्याने १०१ पट आधिक फळ मिळते आणि सौभाग्याची देखील प्राप्ती होते. याच चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. त्यामुळे यादिवशी गणपतीची पूजा, उपवास आणि कीर्तन जागरण केलं जाते.

गणपतीच्या जन्माची कथा
गणपतीच्या जन्माविषयी शिवपुराणात एक गोष्ट सांगितलेली आहे. या कथेनुसार माता पार्वतीने आपल्या शरीरावर हळद आणि उटण्याचा लेप लावला होता. त्यानंतर त्यांनी हा लेप काढल्यानंतर त्याचा एक छोटा गोळा तयार झाला होता. माता पार्वतींनी आपल्या शक्तींनी या गोळ्यात प्राण ओतलाआणि अशा प्रकारे गणपतीचा जन्म झाला. त्यानंतर त्या आंघोळीसाठी गेल्या आणि कुणालाही आतमध्ये येऊ न देण्याचे गणपतीला सांगितले.

त्याचदरम्यान, भगवान शंकर तेथे आले. त्यांना आतमध्ये जायचे होते, मात्र बाल गणपतीने त्यांना आतमध्ये जाऊन दिले नाही. भगवान शंकरांच्या अनेक विनंत्यानंतर देखील त्याने त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर प्रचंड राग आलेल्या भगवान शंकरानी आपल्या त्रिशुलाने त्याचे मुंडके उडवले. त्यानंतर माता पार्वती त्या ठिकाणी आल्या असता गणपतीची अवस्था पाहून रडू लागल्या. त्यांनी गणपती हा आपला पुत्र असल्याचे सांगितल्यानंतर शंकर देखील स्तब्ध झाले. आणि माता पार्वतीने त्यांना गणपतीच्या जन्माची कथा सांगितली. त्यानंतर भगवान शंकरानी एक हत्तीचे डोके आणून बाल गणपतीच्या धडावर लावले आणि त्याच्यात प्राण ओतले. अशा प्रकारे बाल गणपतीचा पुन्हा जन्म झाला आणि ते गजानन या नावाने ओळखले जाऊ लागले.

आरोग्यविषयक वृत्त –