राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे ८ निर्णय

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन
राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्वाचे आठ निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील ४० टक्के ते ७९ टक्के दिव्यांगांना ८०० रुपये तर ८० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्याचा महात्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अनेक आंदोलने केली होती. यानिर्णयांसह इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे…
[amazon_link asins=’B01JOKVSIE,B075LFQL8S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2267780-c71d-11e8-bd7b-832c1d5a22a3′]
१) अटल साैर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यांमध्ये ७ हजार कृषी पंप लावण्यास मंजुरी.
२) राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर आैरंगाबाद, अकोला, सोलापूर आणि धुळे याठिकाणी महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापण करण्यात येणार आहे.
३) मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत ससून गोदी बंदराच्या नूतनीकरणास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
४) रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापणेस मान्यता.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6ea92df9-c71d-11e8-a98b-5b2df6bed3e6′]
५) किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत २०१८ -१८ हंगामामध्ये खरेदी केलेल्या धान्याची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने केलेल्या प्रितिक्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून तीस रुपये वाढीव भरडाई दर देण्यास मान्यता.
६) वस्तू व सेवा कर परिषदेने शिफारस केल्यानूसार महाराष्ट्र वस्तून व सेवा कर अधिनियम – २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय
७) महाराष्ट्र राष्ट्रिय विधि विद्यापीठ अधिनियम- २०१४ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक सादर करण्याची माण्यता.
८) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील ४० टक्के ते ७९ टक्के दिव्यांगांना ८०० रुपये तर ८० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य