कामाची गोष्ट ! 1 मार्चपासून बदलणार गॅस सिलेंडर, 2000 रूपयाची नोट, GST सह ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून देशातील अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा परिणाम थेट तुमच्यावर होईल. या नव्या नियमाने एकीकडे दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. यात स्वयंपाक गॅसचे दर, एटीएममधून पैसे काढण्याचे नियम, बँक खात्याची केवायसी करणं, जीएसटी, डेबिट आणि क्रेडिट कार्डसंबंधित नियम इत्यादी नियमांचा समावेश आहे.

एटीएमधून निघणार नाही 2000 रुपयांची नोट –
ग्राहकांच्या सुविधेचा विचार करता इंडियन बँकने निर्णय घेतला आहे की, 1 मार्च 2020 पासून बँक 2000 रुपयांच्या नोटांसंबंधित एक मोठा बदल करणार आहे. ग्राहकांना एटीएममधून 2000 रुपयांची नोट काढता येणार नाही. इंडियन बँकेने निर्णय घेतला की ते एटीएममध्ये 2000 रुपयांची नोट टाकणार नाहीत. यासंबंधित सूचना बँकेने आपल्या सर्व शाखांना दिले आहेत.

बँकेने जारी केले होते सर्कुलर –
यासाठी बँकेने 17 फेब्रुवारी 2020 ला एक सर्कुलर जारी केले होते. यासंदर्भात बँकेने सांगितले की 2000 रुपयांच्या नोटा काढल्यानंतर ग्राहक जेव्हा दुकानात किंवा इतर ठिकाणी जातात तेव्हा त्यांना ते सूटे करण्यास अडचणी येतात.

200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढणार –
बँकेच्या सर्कुलरनुसार 1 मार्च 2020 नंतर इंडियन बँकच्या एटीएममध्ये 2,000 रुपयंच्या नोटा ठेवण्याचे कॅसेट्स डिसेबल केले आहेत. म्हणजेच नोटा मिळणार नाहीत. बँक ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम मशीनमध्ये 200 रुपयांच्या नोटांच्या कॅसेट्सची संख्या वाढवले.

बँकेच्या ब्रांचमध्ये उपलब्ध होणार 2000 च्या नोटा –
असे असले तरी बँकेच्या शाखामध्ये 2000 च्या नोटा उपलब्ध असतील. बँकेतून पैसे काढताना ग्राहकांना 2000 च्या नोटा दिल्या जाऊ शकतात. बँकेने हे स्पष्ट केले की ग्राहकांनी 2000 च्या नोटा एक्सचेंज करण्यासाठी बँक शाखेत यावे.

फक्त एकाच बँकेने घेतला हा निर्णय –
हा निर्णय फक्त एकाच बँकेने इंडियन बँकेने घेतला आहे. इतर कोणत्याही बँकांनी असा निर्णय घेतला नाही. एटीएम सेवा देणारी कंपनी फायनाशिअल सॉफ्टवेअर अॅण्ड सिस्टमचे अध्यक्ष वी बालासुब्रमण्यम म्हणाले की यासंबंधित कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाही.

बदलणार गॅसचे दर –
उद्यापासून स्वयंपाक गॅस सिंलडरच्या किंमती बदलणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतो, परंतु फेब्रुवारी महिन्यात 12 तारखेला यात बदल झाले होते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, फेब्रुवारीमध्ये दिल्लीत 14.2 किलो ग्रॅस सिलेंडर 144.50 रुपयांनी महागले होते. हा सिलेंडर 858.50 रुपये आहे. तर कोलकत्तामध्ये सिलेंडर 149 रुपयांनी महागले होते. मुंबईत सिलेंडर 829.50 रुपये आहे तर चेन्नईमध्ये 881 रुपये आहे.

सरकार देते गॅस सिलेंडरवर सब्सिडी –
सध्या सरकार एक वर्षात प्रत्येक घरामागे 14.2 किलोच्या 12 सिलेंडरवर सब्सिडी देते. जर त्यापेक्षा जास्त सिलेंडर ग्राहकांनी खरेदी केले तर ग्राहकांना ते बाजार भावाने खरेदी करावे लागतात. गॅस सिलेंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याला बदलत असतात. गॅसच्या किंमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि विदेशी विनिमय दरातील बदलांवर अवलंबून असतात.

लॉटरीवर 28 टक्के जीएसटी –
लॉटरीवर 1 मार्च 2020 पासून 28 टक्के जीएसटी लागणार आहे. महसूल विभागाच्या नव्या नियमानुसार, लॉटरीवरील केंद्राचा कर 14 टक्के आहे तर राज्य सरकार देखील समान दराने कराची वसुली करेल. यामुळे 1 मार्चपासून लॉटरीवर एकूण जीएसटी 28 टक्के जाईल. जीएसटी परिषदेने डिसेंबर 2019 मध्ये राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या आणि मान्यता प्राप्त लॉटरीवर एक समान दराने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता.

कधीही बदलता येणार कार्डवरील व्यवहारावरील मर्यादा –
RBI ने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट कार्डसंबंधित नवे नियम जारी केले आहेत. आरबीआयकडून बँकांना सांगण्यात आले की भारतातील सर्व कार्ड जारी करताना एटीएम आणि पीओएसवर फक्त डोमेस्टिक कार्ड वापरण्याची परवानगी द्यावी.

RBI कडून सांगण्यात आले की आंतरराष्ट्रीय देवाण – घेवाणीसाठी मंजुरी घ्यावी लागेल. याशिवाय ऑनलाइन व्यवहार, कार्ड नसताना होणारे व्यवहार आणि कांटेक्टलेस व्यवहारासाठी ग्राहकांना आपल्या कार्डवर या सेवांना वेगळे सेट करावे लागतील.

हा नियम 16 मार्च 2016 पासून येणाऱ्या नव्या कार्डवर लागू होईल. जुने कार्डधारक हे निश्चित करु शकतात की यातील कोणत्या सुविधेला त्यांना कधी बंद करायचे आहे आणि कधी सुरु करायचे आहेत.