पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सायबर पोलीस ठाण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय…

गुन्हे शाखेसारखे पाच युनिटमध्ये चालणार काम; गुन्ह्यांची उकल अन कामात येणार सुस्पष्टता...

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   वाढत्या सायबर गुन्ह्यांना ब्रेक लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सायबर पोलीस ठाण्याचे रूपच बदलत त्यात नेमकेपणा आणला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्यासोबतच त्याची उकल करण्यात मदत होणार आहे. गुन्हे शाखेच्या युनिटनुसार आता सायबरचे देखील 5 युनिट केले असून, हेडनुसार यापुढे सायबर गुन्ह्यांचे वर्गीकरण आणि त्याचा तपास असणार आहे.

मुंबईनंतर शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांचे 15 हजार अर्ज सायबर पोलिस ठाण्यात आले होते. प्रत्येक वर्षी सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाण्याचे सक्षमीकरण करणे आवश्यक होते. त्यासाठी या ठिकाणचे मनुष्यबळ वाढविण्याबरोबर कामात सुसुत्रता आणण्याचे नियोजन गरजेचे होत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडे लक्ष दिले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार सायबर गुन्ह्याच्या प्रकारानुसार आता पाच युनिट तयार करण्यात आली आहेत. गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार त्या त्या युनिटकडे संबंधित गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत.
यापुढे सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक त्यादिवशीच्या तक्रार अर्जाचे त्या त्या युनिटला वाटप करतील. युनिटचे पोलिस निरीक्षक तक्रारी अर्ज पुढील कार्यवाहीसाठी त्यांचेकडील अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देतील. तक्रार अर्ज पोलिस ठाण्यांकडे पाठविण्याबाबत व तक्रार चौकशीनंतर अर्ज दप्तरी दाखल करण्याबाबत पर्यवेक्षण करतील. अर्जदाराच्या फसवणुकीची रक्कम १० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास व तक्रारदार यांची संख्या जास्त असेल तर उपायुक्तांकडून मार्गदर्शन करत पुढील कारवाई होईल.

यापूर्वीच सायबर…

पुर्वी एकाच तपास अधिकार्‍याकडे विविध प्रकारचे गुन्हे तपासासाठी असत. यामुळे वेळ व श्रमाचा अपव्यय होत. नव्याने केलेल्या बदलामुळे आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी असतील. हॅकिंग/डाटा चोरी, ऑनलाईन बिझनेस फ्रॉड, चिटिंग फ्रॉड, सोशल नेटवर्किग व एटीएम कार्ड फ्रॉड अशी ही पाच युनिट काम करणार आहेत.

अशी असणार युनिट

१) हॅकिग,डाटा चोरी :  डाटा इनस्कीप्ट, मेल हॅकिग, डाटा चोरी, डिजिटल सीगनेजर,
ऑनलाईन बिझनेस फ्रॉड : ओएलएक्स, फ्लिपकार्ड फ्रॉड, मल्टी लेव्हल मार्केटिंग, हॅकिग मोबाईल मनी टॉन्सफर, ऑनलाईन सेल अँन्ड परचेस फ्रॉड

२) चिटिंग फ्रॉड :  ऑनलाईन डेटिग साइट फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉड, जाब फ्रॉड, लोन फ्रॉड, पॅकेज टुर फ्रॉड, मोबाईल टॉवर फ्रॉड, मेट्रिमोनियल फ्रॉड

३) सोशल नेटवर्किग :  फेसबुक, फेक डॉक्युमेंट, फेसबुक हॅकिग एक्सट्रोशन, डिफमेशन, अपलोड व्हिडिओ इत्यादी.

४) एटीएम कार्ड फ्रॉड :  मनी ट्रान्सफर डेबिट, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड फ्रॉड, ओटीपी शेअर फ्रॉड, मोबाईल, लॅपटॉप चोरी इतर

५) प्रशासन :  पोलिस ठाण्याचे कार्यालयीन कामकाज, सायबर पोर्टल, पोलि ठाण्यांना तांत्रिक सहाय्य.