दारूबंदी बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टीच्या भागात असलेल्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय चंद्रपूरच्या दारुबंदीबाबत देखील महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी मागील वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात ज्या प्रमाणे मदत केली होती. तशी मदत यावेळीही देखील करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, आज झालेल्या मंत्रमंडळ बैठकीत तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरभाई वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रपूरच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षापासून दारुबंदी करण्यात आली होती. मात्र, त्याचा उलटा परिणाम दिसून आला. दारुबंदीमुळे चंद्रपूरात अवैध दारुची विक्री आणि गुन्हेगारी फोफावली होती. हे रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

Covid Somnia Cure : तुम्हाला कोरोना सोमनियाची समस्या तर नाही ना? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Pune : जामिनासाठी बोगस कागदपत्रे तयार करणार्‍या टोळीतील एकास अटक

निलेश राणेंचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले…

खतांवरील अनुदान कसं मिळवायचं? कोणती कागदपत्रे लागतील?, जाणून घ्या