‘ठाकरे सरकार’नं मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपयांच्या निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे इतरही महत्वाचे निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

मंत्रीमंडळातील महत्त्वाचे निर्णय
1. राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.
2. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
3. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.
4. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
5. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/