सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! मराठा आरक्षणासाठी पुढील सुनावणी 15 मार्चपासून, याबाबत सर्व राज्यांना नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टात आजपासून मराठा आरक्षणाविषयी सुनावणी सुरू असून, सर्व राज्य सरकारला नोटीस देण्यात आली आहे. १५ मार्चपासून १० दिवस पुन्हा सुनावणी होणार आहे. असा महत्वाचा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. तर ही सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे झाली.

दरम्यान, न्यायमूर्ती नागेश्‍वर राव यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे देण्यात आले होते. तर पाच सदस्यीय खंठपीठाने ५ फेब्रुवारी रोजी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले होते. तर यानुसार ८ ते १० मार्च या तीन दिवसांमध्ये विरोधक बाजू मांडणार होते. परंतु या प्रकरणी आता १५ मार्चपासून १० दिवस नियमित सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आजच्या सुनावणी दरम्यान वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडत ‘या प्रकरणामध्ये A.342A चे स्पष्टीकरण आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक राज्यावर होईल. म्हणून त्यांनी एक अर्ज दाखल करून प्रत्येक राज्यातील सुनावणी घ्यावी. प्रत्येक राज्याला ऐकल्याशिवाय या विषयाचा योग्य निर्णय होणार नाही असे म्हटले आहे. तर कपिल सिब्बल यांनी प्रत्येक जण महाराष्ट्र राज्याच्या वतीने म्हणत आहे की, भारतातील प्रत्येक राज्यात या प्रकरणात पक्ष करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक राज्यात ५० टक्के कॅप आरक्षण आहे. तर कोर्टाने फक्त केंद्र आणि महाराष्ट्रात सुनावणी घेऊन निर्णय घेऊ नये. आपल्या लॉर्डशिप्सने सर्व राज्यांना नोटीस दिली पाहिजे. हा मुद्दा सर्व राज्यांना प्रभावित करणारा घटनात्मक प्रश्न आहे.असा त्यांनी युक्तिवाद केला.