लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांची पुणे आयुक्तालयात महत्वाची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस महासंचालक पदी नियुक्त झाल्यानंतर सुबोध जयस्वाल हे आज पुण्याला प्रथमच भेट देत आहेत. त्यानिमित्ताने दुपारी पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात पुणे पोलिसांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. त्यात प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्था तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी यावर चर्चा होणार आहे. निवडणुक आयोगाने केलेल्या सूचनांनुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, याची पहाणी केली जाईल. त्याचबरोबर सुबोध जयस्वाल हे पुणे पोलिसांना आपल्याला कोणत्या पद्धतीने काम अपेक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी भष्ट्राचाराविषयी मुंबई पोलिसांना अनेकदा फटकारले होते. लाच घेताना सापडलेल्या अधिकाऱ्यांवर त्यांनी तातडीने कारवाई केली होती. तोच कित्ता आता ते राज्यात गिरविण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने या बैठकीत काही महत्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला