Telegram मध्ये Save करू शकता आवश्यक मॅसेज, जाणून घ्या सोपी पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीच्या बातम्यांनंतर लाखो लोकांनी टेलीग्रामचा वापर सुरु केला आहे. अशावेळी अनेक यूजर्सना टेलीग्रामच्या अनेक खास फीचर्सबाबत माहिती नाही. टेलीग्रामचे एक असेच लेटेस्ट फीचर आहे, ज्यामुळे दुसर्‍या मॅसेजिंग अ‍ॅपपेक्षा हे अ‍ॅप वेगळे ठरते. आम्ही तुम्हाला टेलीग्रामच्या ज्या खास फीचरबाबत माहिती देणार आहोत, त्याद्वारे तुम्ही कोणताही आवश्यक मॅसेज सेव्ह करू शकता. हे खुप उपयोगी फीचर आहे. या फीचरने तुम्ही तुमचा आवश्यक डेटा जसे की फोटो, डॉक्यूमेंट आणि ऑडियो फाईल्स सेव्ह करू शकता. टेलीग्राम हा डेटा क्लाऊडवर सेव्ह करते. तुम्ही कोणत्याही डिव्हाइसमधून आपल्या अकाऊंटमध्ये लॉगइन करून डाटाचा वापर करू शकता. यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेवूयात…

असा सेव्ह करा आपला आवश्यक मॅसेज आणि डेटा –

यासाठी तुम्ही टेलीग्राम अ‍ॅपमध्ये टॉप लेफ्टमध्ये दिलेल्या मेन्यूवर क्लिक करा. आता येथे देण्यात आलेल्या सेव्ह मॅसेजला सिलेक्ट करा. आता एक चॅट बॉक्सप्रमाणे बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही आवश्यक मॅसेज, फोटो, व्हिडिओ आणि दूसर्‍या डॉक्यूमेंट्स सेव्ह करू शकता. तुम्ही जुने मॅसेज किंवा फोटो सुद्धा येथून डिलीट सुद्धा करू शकता.

चॅट मोठे असल्यास आवश्यक मॅसेज मिळत नाही –

अनेकदा चॅट करताना काही आवश्यक फोटो, मॅसेज किंवा डॉक्यूमेंट आपल्या चॅटबॉक्समध्ये असतात. अशावेळी चॅट मोठे असल्यास असे आवश्यक मॅसेज सर्च करणे सुद्धा अवघड होते. याशिवाय अनेक मॅसेज असल्याने आवश्यक मॅसेज सुद्धा डिलीट होतात. यापासून वाचण्यासाठी तुम्ही ते मॅसेज किंवा फोटो सेव्ह करू शकतात. यामुळे आवश्यक मॅसेज सर्च करणे खुप सोपे होते.