‘या’ तारखेला पुण्यात मान्सून दाखल होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याने जर उत्तरेकडे वाटचाल केली तर मान्सूनला राज्यात येण्यास सुलभ वाट होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपि यांनी दिली आहे. सध्याच्या अंदाजानुसार 8 जूनला मान्सून सिंधुदुर्गात दाखल होईल आणि 14 जूनला तो संपूर्ण राज्य व्यापेल. याच दरम्यान पावसालाही सुरुवात होईल.

अरबीसमूद्रात येमेनच्या बाजूला अजून एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो ओमानच्या दिशेने प्रवास करेल. त्याचा कोणताही परिणाम या मान्सूनवर होणार नाही. केरळ जवळ तयार होणारा कमी दाबाचा पट्टा सोमवार (दि.1) पर्यंत पूर्णपणे विकसित होईल. त्यानंतर त्याच्या प्रवासाची दिशा निश्चित करता येईल, असे डॉ. कश्यपि यांनी सांगितले. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

मान्सून पुर्व पावसाची शक्यता
पुण्यासह राज्यात रविवारी (दि.31) दुपार नंतर आकाश अंशत: ढगाळ असेल. तर तुरळक ठिकाणी पुर्वमान्सूनचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे. शहरातील तापमानात देखील घट झाली असून गुरुवारी (दि.28) कमाल सरासरी तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर किमान तापमान 23.9 अंश सेल्सिअस होते. शनिवारी (दि.30) पर्यंत शहर आणि परिसरातील सरासरी तापमानाची स्थिती तशीच राहील.

मंगळवार (दि.2) नंतर शहरात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पुर्व मान्सून पाऊस होऊ शकतो, असे डॉ. कश्यपि यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात असलेली उष्णतेची लाट कमी होणार आहे. त्यानंतर पुर्वमान्सून पावसायोग्य वातावरण तयार होईल. पुणेकरांच्या पुढील महिन्याची सुरुवात पुर्वमान्सून पावसाने होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती डॉ. कश्यपि यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like