कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, लोन मोरेटोरियम योजनेमुळे बँकांवर झाला ‘हा’ परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना साथीच्या आजारामुळे केंद्र सरकार आणि आरबीआयने (Central Government and RBI)  लोकांना लोन मोरेटोरियमची सुविधा दिली होती. 40 टक्के कर्जदारांनी त्याचा लाभ घेतला. परंतु या लोन मॉरेटोरियम योजनेचा आगामी काळात बँकांवर मोठा परिणाम होणार आहे. यासाठी आरबीआयने बँकांनाही तयार राहण्यास सांगितले आहे. जाणून घेऊया आरबीआयने (RBI)  आपल्या अहवालात काय म्हटले …

बँकांवर होणार दूरगामी परिणाम –
आरबीआयने मंगळवारी देशाच्या बँकिंग प्रणालीचा वार्षिक अहवाल जाहीर केला. ज्यामध्ये आरबीआयने म्हटले आहे की कोरोना साथीचे आणि लोन मोरेटोरियम योजनेेचा भारतीय बँका आणि एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्सियल कंपन्या) वर दूरगामी परिणाम होईल. रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, याचा सर्वात जास्त परिणाम लघु वित्त बँक, पेमेंट बँक, सहकारी बँक, एनबीएफसीवर होईल. कारण त्या सर्वांकडे उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत आहेत. त्याच वेळी, आरबीआयच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्था आणि बँकिंग प्रणालीमध्ये बरेच बदल दिसतील आणि बँकांनी त्यांचा सामना करण्यास तयार असले पाहिजे.

बँकिंग प्रणालीत बदल –
आरबीआयच्या अहवालानुसार बँकिंग प्रणालीत तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग अनेक आव्हाने आणेल. एक नवीन प्रकारचे बँकिंग मॉडेल उदयास येईल. अहवालात म्हटले आहे की सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत भारतीय बँकांमधील अडचणीत असलेल्या कर्जाची (एनपीए) पातळी 7.5 टक्क्यांवर आली आहे, परंतु ही वस्तूूूस्थिती नाही.

सध्या बँकांवर होणार नाही कोणताही परिणाम – आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार एनपीएची वास्तविक परिस्थिती सध्या बँकांच्या खात्यावर दिसत नाही. यासह, कोविडचा प्रभाव अद्याप एनपीएच्या आकडेवारीवर दिसत नाही. काही बँकांनी दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास असे सूचित करतो की कोविडमुळे बँकांचे स्थूल एनपीए (एकूण प्रगतीचे प्रमाण कर्ज प्रमाणानुसार) 0.10 टक्क्यांवरून 0.66 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्याचबरोबर आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की,बँकांची मालमत्ता गुणवत्ता कमी होईल आणि भविष्यात त्यांच्या महसुलावरही परिणाम होईल.