सकाळी ६ च्या आधी मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वारात लाऊड स्पीकरवर बंदी ; हाय कोर्टाचा निर्णय

चंदीगढ : वृत्तसंस्था – पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने ध्वनि प्रदूषणासंबंधी दिलेल्या एका निर्णयात स्पष्ट केले आहे की, मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वारामध्ये लिखित परवानगीशिवाय लाऊड स्पीकरचा वापर करणे बेकायदेशीर आहे. न्यायालायने म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत कोठेही सकाळी ६ वाजण्याच्या आधी लाऊड स्पीकरचा वापर करणे पूर्णपणे अवैध आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सहा वाजण्याच्या आधी लाऊड स्पीकरचा वापर केल्यास कारवाई करण्यात येईल.

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात हे पण म्हटले की, अ‍ॅथाॅरिटीकडून लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी मिळाल्यास आवाजाची मर्यादा १० डेसिबल पेक्षा जास्त नसली पाहिजे. उच्च न्यायालयाने या नियमाचे पालन करण्यासाठी पंजाब, हरियाणा, चंदिगढ येथील डीजीपी, डीसी, एसएसपी/एसपी यांना आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे.

याचबरोबर उच्च न्यायालायने पंजाब हरियाणा चंदीगड या प्रदेशांना आदेश देत म्हटले की, रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर आणि म्युझिक सिस्टीम यांवर पूर्णपणे बंदी असेल. कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वर्षातून १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर किंवा म्युझिक सिस्टीम चालू ठेवण्यासाठी सूट दिली जाऊ शकते परंतु ध्वनीची मर्यादा १० डेसिबल असणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त