Coronavirus : फक्त भारतच हरवू शकतो ‘कोरोना’ला, जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कौतुक !

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायसरने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो’,भारताने कोरोनाचा फैलाव लक्षात घेता अनेक कठोर पाऊले उचलली असून ती योग्य असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.कोरोनाला हरवणे हे आपल्या हातात आहे.त्यानुसार भाारतच कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास जागतिक आरोग्य संघटरनेचे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी व्यक्त केला आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या 500 वर पोहचली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केले आहे. भारताने कोरोनाचा फैलाव लक्षात घेता अनेक कठोर पाऊले उचलली पण ती योग्य असल्याचे रेयान म्हणाले आहेत.

देशात कोरोनाला थांबवण्यासाठी सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे. पण त्याला प्रत्येक नागरिकांने पाठिंबा देत नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. कोरोनावर आपणच मात करू शकतो. कोरोनाला पळून लावणे हे प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. त्यामुळे नियम पाळा आणि घरीच सुरक्षित राहा. भारत हा चीनसारख्या जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीनचे काय झाले आपण सर्वांनी पाहिले आहे. मात्र सार्वजनिक आरोग्य पातळीवर भारताने घेतलेली आक्रमक भुमिका योग्य आहे. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा भारत आता देत आहे, असेही रेयान म्हणाले.