मध ‘या’ ७ पदार्थांसोबत खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक

पोलीसनामा ऑनलाइन – आयुर्वेदात मधाला खूप महत्व आहे. पूर्वीपासून मधाचा औषध म्हणून वापर केला जातो. मधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जवळपास सर्वच घरात मध असतेच. विशेष म्हणजे घरात लहान बाळ असल्यास मध आवर्जून घरात ठेवले जाते. असे हे मध योग्य प्रकारे खाल्ले नाही तर आरोग्यावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो. कोण-कोणत्या पदार्थांसोबत मध खावे आणि कोणत्या पदार्थांसोबत खाऊ नये, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

कोणत्या ७ पदार्थांसोबत मध खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मध हे गरम असते. जर ते गरम पदार्थांसोबत खाल्ले तर लूज मोशन आणि इतर आरोग्य समस्या होऊ शकतात. चहा किंवा कॉफीसोबत मध घेतल्यास बॉडीचे टेम्प्रेचर वाढते. यामुळे अस्वस्थता आणि स्ट्रेस वाढतो. मधासोबत मुळा खाल्ल्याने बॉडीमध्ये टॉक्सिन्स तयार होतात. यामुळे बॉडी पाट्र्स डॅमेज होण्याचा धोका असतो.

जास्त गरम पाण्यासोबत मध खाऊ नये. हे बॉडीमध्ये उष्णता निर्माण करते. ज्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते. मटण आणि मासे यांच्यासोबत मध खाल्ल्याने टॉक्सिन्स तयार होते. यामुळे बॉडीवर वाईट प्रभाव पडतो. तसेच कोणत्याही तेलासोबत मध खाऊ नये. यामुळे शरीरातील आतील भागांवर वाईट परिणाम होतो. तुप आणि मध समान प्रमाणात मिसळून कधीही खाऊ नये. असे केल्याने शरीरात विष पसरण्याचा धोका असतो.