कामाची गोष्ट ! ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास कर्जाचा EMI भरताना येणार नाही कसलीही अडचण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाईच्या काळात बँक कर्ज स्वस्त झाले आहे, परंतू ते परत करताना आपण अनेकदा अशा चूका करतो की ज्यामुळे आपल्याला लेट पेमेंट चार्ज भरावा लागतो. एवढेच नाही, जर EMI देण्यास उशीर झाला तर आपला क्रेडिट स्कोर देखील कमी होतो, ज्यामुळे भविष्यात आपल्याला पुन्हा कर्ज घेताना अडचणी येतात.

लेट पेमेंट चार्ज आणि डिफॉल्टर होणं वाचण्यापासून असे काही प्रकार आहे ज्या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळेल आणि कर्ज घेणे देखील सोपे होईल. EMI देताना काही अडचणी येणार नाहीत.

कर्जाचा कालावधी वाढवा –
जर तुम्ही EMI देऊ शकत नसाल तर त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटात येऊ शकतात. जर अशी परिस्थिती असेल तर कर्जदात्याकडे कर्जाचा कालावधी वाढण्यासाठी अर्ज करुन शिकतात. त्यामुळे तुम्हाला रक्कम परत करण्यात जास्त कालावधी मिळेल. परताव्यासाठी जास्त कालावधी मिळाल्याने तुमची डिफॉल्ट होण्याची शक्यता कमी होईल. परंतू तुम्ही कालावधी वाढवून घेतला तर तुम्हाला त्यासाठी जास्त परतावा देखील द्यावा लागेल.

कमी व्याज घेणाऱ्या कर्जदात्याकडे जा –
जर तुम्ही कर्जाचा योग्य प्रकारे परतावा करु शकत नसाल तर बॅलेंस ट्रांसफर करण्याच्या माध्यमातून दुसऱ्या एखाद्या कर्जदात्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या कर्जाच्या EMI चे ओझे कमी करु शकतात. यासाठी कमी व्याजात कर्ज देणाऱ्या कर्जदात्याकडे जाणे तुम्हाला जास्त लाभकारक ठरेल. परंतू ट्रांसफरचा पर्याय निवडताना तुम्हाला या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे की नवीन कर्जदाता तुम्ही नव्या कर्जासाठी अर्ज करत आहात असे मानेल, यासाठी कर्जदाता प्रोसेसिंग फी आणि एडमिनिस्ट्रेटिव शुल्क देखील घेऊ शकतो.

इमरजेंसी फंड –
EMI देण्यासाठी तुम्हाला बचत करणे आवश्यक आहे ज्याचा वापर तुम्ही इमरजेंसी फंड म्हणून करु शकतात. म्हणजेच आर्थिक परिस्थिती फंडातून तुम्ही ही रक्कम वापरु शकतात. जर तुमच्या जीवनात काही वाईट परिस्थिती असेल म्हणजेच तुमची नोकरी जात असेल किंवा तुम्ही आजारी असाल तर हा फंड तुम्हाला कामी येईल.

Visit : Policenama.com