सावधान ! ज्यूस पिण्यापूर्वी ‘ही’ काळजी नक्की घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आरोग्यासाठी अनेकजण ज्यूस तसेच स्मूदीजचे सेवन करतात. मात्र दरवर्षी अशा प्रकारच्या रसांमध्ये टॉक्सिन निर्माण होऊन अनेकांना जीव गमवावा लागतो. दुधीचा रस पिऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मुळात या महिलेने प्यायलेल्या रसात कुकुरबिटासीन हा घटक तयार झाला होता. हा घटक नैसर्गिक टॉक्सिन असून काकडी किंवा त्यांच्यासारख्या भाज्यांमध्ये तयार होतो.
पहिलं म्हणजे आपल्याला दात आहेत त्यामुळे आपण अन्न चावून आणि त्यानंतर गिळून खाल्लं पाहिजे. एखाद्या पदार्थाचा वास किंवा त्याची चव या दोन्ही गोष्टी त्या पदार्थाबाबत जाणून घेण्यासाठी गरजेच्या आहेत. यामुळे त्या खाद्यपदार्थात कोणते घटक आहे याची देखील आपल्याला जाणीव होते. विचित्र वास आणि चव या दोन्ही गोष्टी अनेकदा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात.
ज्यूस तोंडातून थेट छोट्या आतड्यांमध्ये पोहोचतो. रस पोटात कमी वेळ असल्याने पचनाच्या क्रियेला वेळ मिळत नाही. त्यामुळे रसात असणाऱे घातक घटक थेट आतड्यांमध्ये जातात. त्यानंतर हे घटक यकृताकडे जातात. यामध्ये जर घातक घटक असले तर त्याचा परिणाम यकृतावर होतो. त्यामुळे शक्यतो भाज्या किंवा फळं चावून खावीत. हे पदार्थ सावकाश चावा आणि हळू खावेत. द्रवपदार्थ हे लहान बाळांसाठी आणि वयस्कर व्यक्तींसाठी असतात. आणि मुख्य म्हणजे लोकांनी त्यांचं अन्न स्वतः शिजवून खाल्लं पाहिजे.
आपण एखादा पदार्थ पाहतो, त्याचा वास घेतो आणि तो चावतो त्यावेळी आपला मेंदू त्याचं विश्लेषण करतो. ज्यावेळी अन्न तोंडात जातं त्यावेळी अ‍ॅसिड तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही होते. पोटातमध्ये प्रोटीन्सचं पचन होतं. मुळात टॉक्सिन किंवा विष हे देखील प्रोटीन्सचं असतात. अन्न पोटात गेल्यावर पेप्सनोजेन हे केमिकल तयार होण्यास सुरूवात होते आणि त्यासोबतच प्रोटीन्सच्या पचनाच्या क्रियेलाही सुरूवात होते. या टॉक्सिनचा पोटाला शक्यतो त्रास होत नाही.