Imported liquor Rates | मद्यप्रेमींसाठी खुशखबर ! विदेशी दारू झाली स्वस्त, आयातीचे विशेष शुल्क दर कमी केल्याने किंमत निम्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने (Thackeray Government) विदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला होता. १८ नोव्हेंबरपासून हे दर लागू केले होते. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने (state excise department) दारूच्या निर्मिती शुल्काचा (Imported liquor Rates) विचार करून दारूचे नवीन दर जाहीर केले आहेत. सध्या आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून इतर कंपन्यांचेही दर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लोकांना आता अन्य राज्यांतून काही रुपयांसाठी मद्याची ने-आण करण्याची गरज पडणार नाही. पण तरीदेखील कोणी तशी ने- आण केली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. (Imported liquor Rates)

राज्य सरकारने विशेष शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विदेशातील आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत आले आहेत. विदेश मद्याचे दर कमी झाल्याने तस्करीला ही आता आळा बसेल. शिवाय बनावट मद्य आणि चोरीचे प्रकार कमी होतील, असा दावा करण्यात येत आहे.

मद्याचे नाव – जुना दर – नवीन दर

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – ५७६० रुपये – ३७५० रुपये

 

जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – ३०६० रुपये – १९५० रुपये

 

जे अँड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – ३०६० रुपये – २१०० रुपये

 

जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की – ३८०० रुपये – २५०० रुपये

 

ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – ३०७५ रुपये – २१०० रुपये

 

शिवास रिगल (१२ वर्षे जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – ५८५० रुपये – ३८५० रुपये

 

जॉर्डन्स लंडन ड्राय जीन – २४०० रुपये – १६५० रुपये

 

Web Title :- Imported liquor Rates | reduced rates of special duty imported liquor maharashtra Government Thackeray Government Imported liquor Rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ankita Lokhande | लवकरच अंकिता लोखंडेच्या घरी वाजणार सनई चौघडे; 3 दिवसानंतर होणार ‘नवरी’

MLA Gopichand Padalkar | एसटी कामगार संपावरून पडळकरांचा सरकारवर आरोप; म्हणाले – ‘मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..’

Life Certificate | UIDAI ने दूर केली पेन्शनर्सची सर्वात मोठी समस्या, घरबसल्या होईल Pension चे हे काम