पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या फोटोचा ‘गैर’वापर केल्यास 6 महिन्यांपर्यंत ‘तुरूंग’वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या फोटोचा गैरवापर केल्यास यापुढे तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत तरूंगवास होऊ शकतो. खासगी जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोचा वापर वाढल्याने सरकार यावर नियम बनवण्याचा विचार करत असून तुरुंगवासाबरोबर शिक्षेची रक्कम हि 1 हजारावरून थेट पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.

ग्राहक सरंक्षण मंत्रालयाने यासाठी नवीन ड्राफ्ट तयार केला असून यामध्ये अनेक ठिकाणी संशोधन करून हा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. कायदा मंत्रालयाने देखील याला मंजुरी दिली असून हा ड्राफ्ट कॅबिनेटकडे पाठवला जाईल. त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये तो संमत केली जाण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदा उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड –

या नवीन सुधारित कायद्यामध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली असून तुम्ही या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा दोषी आढळल्यास तुम्हाला एक लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच दुसऱ्यांदा केल्यास पाच लाख रुपये दंड म्हणून स्वीकारण्यात येईल. तसेच 3 ते 6 महिने तुरूंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात येईल.

यामुळे महत्वाचा आहे कायदा –

राष्ट्रीय व्यक्तींच्या प्रतिमेला धक्का न बसण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा खराब न करण्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. त्याचबरोबर या कायद्यामुळे राष्ट्रीय स्मारकांचे देखील सरंक्षण होणार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like