श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर सापडला IED बॉम्ब, सैन्याच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

पोलिसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे एक मोठा अपघात टळला. श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीला (आरओपी) एक आयइडी सापडले. हे एक्सप्लोझिव्ह टप्पर पट्टनच्या पेट्रोल पंपाजवळील पुलाखाली बसविण्यात आले होते. सैन्याने वेळेत डिफ्यूज केल्यामुळे एक मोठा अपघात टळला आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील 370 कायदा हटवून राज्याला केंद्र शासित प्रदेश घोषित करण्यात आले होते. त्याला उदया एक वर्ष पूर्ण होत आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी 5 ऑगस्ट रोजी घातपात करू शकतात. यासाठी सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहीम राबविली जात आहे. यासह श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा कर्फ्यू 4 आणि 5 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने कर्फ्यू ऑर्डर जारी केला होता. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, काही फुटीरवादी आणि पाकिस्तान समर्थित संघटना जिल्ह्यात 5 ऑगस्ट रोजी ’ब्लॅक डे’ साजरा करणार आहेत. यामुळे श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की फुटीरतावादी संघटनेचे लोक हिंसक निदर्शने देखील करू शकतात. ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.