IMPS | आरबीआयनं बदलला पैशांच्या व्यवहाराचा ‘हा’ नियम, आता 2 लाखाऐवजी 5 लाख रुपये करू शकता ‘ट्रान्सफर’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  जर तुम्ही सुद्धा इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. रिझर्व्ह बँकेने IMPS (Immediate Payment Service) द्वारे होणार्‍या ट्रांजक्शनची मर्यादा वाढवली आहे (IMPS transaction limit has been increased). आता एका दिवसात 2 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. म्हणजे आता ऑनलाइन फंड ट्रान्सफर करणे आणखी सोपे झाले आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
आता RTGS चा टायमिंग 24बाय7 झाला आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळी आरटीजीएस ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता.

NEFT द्वारे फंड ट्रान्सफर करण्याची किमान मर्यादा नाही

NEFT द्वारे फंड ट्रान्सफर करण्याची कोणतीही किमान मर्यादा नाही म्हणजे तुम्ही कितीही पैसे ट्रान्सफर (IMPS) करू शकता जर मॅक्झिमम लिमिटबाबत बोलायचे तर ते बँकांनुसार वेगवेगळे असू शकते.

रेपो रेट 4% वर कायम

शुक्रवारी तीन दिवसीय बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी म्हटले, आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35% च्या दरावर कायम आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखालील चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ने 22 मे 2020 ला शेवटच्या वेळी रेपो दरात बदल केला होता.

 

Web Title : IMPS | rbi imps transaction daily limit increased 2 lakh to rupees 5 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tata Group | रतन टाटा यांच्या 2 कंपन्यांनी करून दिली जबरदस्त ‘कमाई’, जाणून घ्या कसा झाला गुंतवणुकदारांचा फायदा

Pune Crime | खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ लक्झरी बसमधून 6 किलो चरस जप्त, राजगड पोलिसांकडून तरुणाला एकाला अटक

44 कोटी SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून 3 दिवस ‘या’ वेळेत करू शकणार नाही पैशांचा व्यवहार; जाणून घ्या का?