पाकिस्तानचे इम्रान खान यांची अमेरिकेत ‘हेटाई’, करावा लागला चक्‍क ‘मेट्रो’मधून प्रवास

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या फारच ढासळली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान हे सध्या विवंचनेत आहेत. त्यामुळे सध्या ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. इम्रान खान हे सध्या अमेरिकेच्या ३ दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. इम्रान खान अमेरिकेला पोहचले असून त्यांचा अमेरिकेचा प्रवास चर्चेचा विषय बनत आहे.

अमेरिकेला जाण्यासाठी इम्रान खान यांनी कतार एअरवेजच्या सामन्य फ्लाईटने प्रवास केला. तर चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे इम्रान खान यांना अमेरिकेत पोहचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचा कोणताही शासकिय अधिकारी विमानतळावर उपस्थित नव्हाता. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर इम्रान खान यांनी कुरेशी यांच्यासोबत गाडी नाही तर चक्क मेट्रोने प्रवास केला.

मेट्रोने केलेल्या प्रवासात इम्रान खान यांना अनेक पाकिस्तानी वंशाचे लोक भेटले. इम्रान खान यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. इम्रान खान अमेरिकेत ३ दिवसांच्या दौऱ्यावर असून दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेतील पाकिस्तानच्या दुतावासात राहणार आहेत.

इम्रान खान हे अमेरिकेत तीन दिवस राहणार असून या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यामागील कारण पाकिस्तानची घसरती अर्थव्यवस्था आहे, असं म्हटलं जात आहे. तसंच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, व्यापार आणि कर्ज या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तसंच या बैठकीत दहशतवादावरही चर्चा होऊ शकते.

दरम्यान, इम्रान खान यांच्या आधी ऑक्टोबर २०१५मध्ये अमेरिका दौऱ्यावर माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ हे गेले होते. त्यानंतर आता इम्रान खान गेले आहेत. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था कधीही ढासळू शकते. त्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषय वृत्त –

You might also like