Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेता इम्रान खानने (Imran Khan) 2008 मध्ये आलेल्या ‘जाने तू… या जाने ना’ या हिट चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इम्रान खानने ‘एक मैं और एक तू’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘दिल्ली बेली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. तो शेवटचा 2015 मध्ये आलेल्या ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात दिसला होता. इमरान खान (Imran Khan) हा आमिर खानचा भाचा आहे .
इम्रानने अनेक सिनेमे केले पण गेल्या अनेक दिवसांपासून इम्रान पडद्यावरून गायब आहे. इम्रानने अभिनय सोडला असून आता तो चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करत असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या वर्षीच्या मिशन मार्स: कीप वॉकिंग इंडिया या लघुपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. 2019 मध्ये इम्रान पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त झाल्यामुळे चर्चेत आला होता. मात्र अद्याप त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतलेला नाही.
इम्रान खान आणि अवंतिका खानची मुलगी इरा खानच्या एंगेजमेंटमध्येही दिसला होता.
इम्रान खान (Imran Khan) 5 फेब्रुवारीला साऊथ अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत दिसला होता.
सार्वजनिक ठिकाणी गर्दीतून जाताना दोघांनी एकमेकांचा हात धरलेला दिसला.
दोघेही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते.
त्यामुळे ते दोघे रेलशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाना उधाण आलय .
लेखा वॉशिंगटन ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय लेखा एक प्रोडक्ट डिझायनरही आहे.
‘मटरू की बिजली का मनडोला’ या चित्रपटात इम्रान खान आणि लेखा या दोघांनी एकत्र काम केलं आहे.
Web Title :- Imran Khan | aamir khan nephew imran khan dating rumours with south actress lekha washington
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…