PM इम्रान खान ‘संतापले’ ; म्हणाले, ‘भारतावर आक्रमण करू का’ ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले आहे. त्यानंतर आता जम्मू-काश्मिरचे तीन विभागात विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता जम्मू, काश्मिर, आणि लडाख असे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या या निर्णयाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या देशातील पेचात पडले आहेत. तसंच त्यांची चांगलीच वाताहात होताना दिसत आहे.

पाकिस्तानी संसंदेत भारताच्या या निर्णयावरून विरोधी पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यीं त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना इम्रान खान हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा त्यांनी विरोधी पक्षांनाचा सल्ले मागितले. भारतीय सरकारने काश्मिरप्रश्नावर घेतलेल्या निर्णयावर आपल्या सरकारने काय पाऊले उचलली पाहिजेत हे तुम्हीच सांगा. तसंच मी असे कोणते पाऊल उचलले नाही. आपले परराष्ट्रीय मंत्रालय इतर सर्व देशांच्या राजदूतांसोबत बैठक घेत आहे. मी दुसऱ्या देशांशी संपर्क करत आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावरही मदत मागितली आहे. याहून अधिक मी काय करायला हवं, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

इम्रान खान यांचा राग एवढ्यावर थांबला नाही तर आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे मदतीचा हात मागत आहोत. तंसच इस्लामिक सहयोग संघटनेकडूनही मदत मागत आहोत. तसंच अशी कोणती गोष्ट आहे जी मी केलेली नाही, त्यामुळे तुम्ही मला बोलत आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच आता या भारतावर हल्ला करायचा का?, संतप्त होऊन त्यांनी असाही सवाल यावेळी केला.

आमच्या सरकारला शेजारील सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी आम्ही आफगाणिस्तान, ईरान, आणि भारत या तिन्ही देशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नरेंद्र मोदींनी याचा गैरअर्थ काढत निवडणुकांसाठी फायदा करत पाकिस्तावर टीका केली, असंही इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं. तसंच युद्ध झाल्यास याचे दोन परिणाम होतील. एक म्हणजे हे यूद्ध आपल्या विरोधात जाऊ शकते तेव्हा हात वर करू पराभव मान्य करावा. आणि दुसरा म्हणजे टीपू सुल्तानसारखे शेवटच्या क्षणापर्यंत लढावे. जरी तसे केले तरी आपण जिंकूच याची शक्यता फार कमी आहे. याचा प्रभाव सर्व जगावर पडेल आणि सर्वांचा पराभव होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, अखेरीस बोलताना, मोदी सरकारने काश्मीरमध्ये जे केले ते त्यांच्या विचारसरणीला अनुरुप आहे. मोदी सरकार आरएसएसचा अजेंडा पुढे करत आहे. त्यांची ही विचारधारा नक्षलवादी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त –