इम्रान खानच्या विधानानंतर पाकिस्तानमधून भारतासाठी आली सर्वात मोठी ‘आनंदवार्ता’, आता काश्मीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर पूर्वेकडील आसाम या राज्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NRC) ची अंतिम लिस्ट जाहीर केली आहे. यावर पाकिस्तान चे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली. सरकारच्या निणर्याचा तीव्र विरोध केला आहे. भारतात सुद्धा ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. महत्वाचं म्हणजे, आता यात सर्वोच्च न्यायालयाने उडी घेतली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० वर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अणुबॉम्बचा पाकिस्तान कडून पुन्हा उल्लेख
पुन्हा पुन्हा पाकिस्तान भारताच्या विरोधात वक्तव्य करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आधीही अणुबॉम्बचा उल्लेख केला आहे आत पुन्हा भारताच्या अगोदर न वापर करण्याच्या आण्विक धोरणचा उल्लेख करत पाकिस्तानचे तसे काही धोरण नसल्याचे सांगत सुटला आहे.

भारतासाठी मोठी खुशखबर
जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भात पाकिस्तानकडून एक मोठी खुशखबर आली आहे. आंतराष्ट्रीय न्यायालयात (ICJ ) मध्ये पाकिस्तानचे वकील खावर कुरेशी यांनी एक वक्तव्य दिले आहे त्यामुळे पाकिस्तानची गोची झाली आहे. कुरेशी म्हणाले, काश्मीरच्या मुद्य्यांवर पाकिस्तान जर आंतराष्ट्रीय न्यायालयात गेला तर हे प्रकरण डिफेन्ड करू शकणार नाही. पुढे ते म्हणाले, कारण की, जर जम्मू काश्मीर मध्ये नरसंहार होत असेल तर त्यासंदर्भातले पुरावे जमा करणे अतिशय कठीण असेल. अशा परिस्थितीत भारताची बाजू खूप मजबूत आहे. हीच भारतासाठी मोठी खुशखबर आहे. त्यामुळे पाकिस्तान च्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –