इमरान खाननं ‘कमाई’ करण्याची दिली अजब आयडिया, तुम्ही सुद्धा ऐकून व्हाल ‘हैराण’

लाहोर : पोलीसनामा ऑनलाइन  –  पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचे रूग्ण वाढण्यासह आता नोकतोड्यांचा हल्ला सुद्धा वाढला आहे. येथील शेतकर्‍यांची पूर्ण शेती नाकतोड्यांच्या हल्ल्यात उध्वस्त होत आहे. एकीकडे नागरिक आणि शेतकरी त्रस्त झालेले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नोकतोड्यांबाबत एक असे वक्तव्य केले आहे, जे ऐकून पाकिस्तानची जनता हैराण आहे. इम्रान खान यांनी नाकतोड्यांच्या हल्ल्याला संधी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, लोकांनी नाकतोडे पकडून-पकडून कोंबड्या पाळणारांना विकावेत, ज्यातून त्यांना चांगली कमाई होईल.

इम्रान यांनी म्हटले, देश सध्या दोन प्रकारच्या संकटांना तोंड देत आहे. देशात सध्या नाकतोड्यांचा हल्ला वाढला आहे. अशात लोकांनी त्यांना पकडले पाहिजे आणि त्यांना विकून कमाई करावी. जर लोकांनी नाकतोड्यांना पकडून कुक्कुट पालन करणार्‍यांना विकले तर त्यांना त्यामधून कमाईची चांगली संधी मिळेल. कोंबड्या पाळणारे हे नाकतोडे 15 रूपये प्रति किलोच्या दराने विकत घेतील आणि याचा वापर कोंबड्यांचे खाद्य म्हणून करतील.

कॅबिनेटच्या बैठकीत इम्रान खान यांनी नाकतोड्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावाचे समर्थन केले आणि लोकांना नाकतोडे पकडण्यासाठी अर्थ सहाय्य देण्याबाबतही वक्तव्य केले.

बलुचिस्तानमध्ये नाकतोड्यांची दहशत

पीटीवी न्यूज चॅनलनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तान राज्यात नाकतोड्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. येथील 31 जिल्ह्यात नाकतोड्यांचा हल्ला झाला आहे, ज्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. खैबर पख्तूनख्वाचे 10, पंजाब राज्याचे चार आणि सिंधचे सात जिल्हे नाकतोड्यांच्या हल्ल्यांनी प्रभावित झाले आहेत. पाकिस्तान सरकार शेतकर्‍यांना पिक वाचवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.