पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले ‘ज्ञान’ वाढवावे ; नेटकऱ्यांचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पाकिस्तान नानाविविध कारणांमुळे ट्रोल होताना दिसत आहे. त्यात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहेत. इम्रान खान यांनी नोबेल पुरस्कार विजेते भारताचे कवी रविंद्रनाथ टागोर यांची कविता लेबनानी-अमेरिकी कवी खलील जिब्रान यांची असल्याचे सांगत ट्वीटरवर पोस्ट केले आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही कविता पोस्ट केली होती. ‘मी झोपी गेलो आणि स्वप्न पाहिलं की, जीवन आनंद आहे. मी जागा झालो आणि पाहिलं की जीवन सेवा आहे. मी सेवा केली आणि मला जाणवलं की सेवेतच आनंद आहे.’ कवितेच्या या ओळीनंतर इम्रान यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहीले की, जे लोक जिब्रानच्या शब्दांमध्ये ज्ञान शोधतात आणि मिळवतात ते अशा प्रकारे समाधानी जीवन प्राप्त करतात, असं त्यांचे ट्वीट होते.

रविंद्रनाथ टागोरांच्या कवितेचे श्रेय खलील जिब्रानला दिल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. इम्रान खान यांनी आपले ज्ञान वाढवावे, असा सल्ला अनेकांनी दिला आहे. एका युजरने तर मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र लावत इम्रान खान यांच्यावतीने रविंद्रनाथ टागोर यांची माफी मागणारा संदेशच टॅग केला.

दरम्यान, इम्रान यांनी केलेल्या ट्वीटवर अनेकांनी लाईक करत शेअर केले होते. तसंच अनेकांनी रिट्विट करत कमेंट्सही दिल्या आहेत. त्यातील अनेकांनी तर रविंद्रनाथ टागोरांच्या फोटोसह त्यांच्या कवितेची ही ओळ असलेले फोटोही पोस्ट केले आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन