बाॅम्ब हल्यानंतर पाकिस्तान बिथरला ; इम्रान खाननं दिली ‘ही’ धमकी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याला भारताने एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. भारताने केलेल्या या हल्ल्यात ३५० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तान लष्कराला तसेच जनतेला सज्ज रहाण्याचे आदेश पाकिस्तान प्रधानमंत्री इम्रान खान यांनी दिले आहेत.
१४ फेब्रुवारी दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले होते. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याला भारताने एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. भारतीय वायुसेनेच्या मिराज २०००’ च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास ३५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई सर्जिकल स्ट्राइक २ च्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताला योग्यवेळी पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ. असे त्यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, पाकिस्तान लष्कराला तसेच जनतेला सज्ज रहाण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. पाकिस्तान प्रधानमंत्री इम्रान खान यांनी पाक नॅशनल सिक्युरिटीची तातडीने बैठकही बोलावली आहे.
विशेष म्हणजे, भारताने केलेल्या या हल्ल्याला ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा कारवा असेही ऑस्ट्रेलियाने सुनावले.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री