वर्षभरात ‘परिवर्तन’ नव्हे तर पाकिस्तानामध्ये ‘बरबादी’ घेऊन आले PM इम्रान खान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे चारही बाजुंनी घेरले गेले असून पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीने देखील इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर भारतीय सरकारच्या राजनीतीक धोरणांमुळे देखील पाकिस्तान एकाकी पडल्याचे त्यांनी कबुल केले.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीपीपीने एक श्वेत पत्रिका काढली. यामध्ये त्यांनी आपल्या सरकारला परिवर्तन सरकार असे नाव नाव दिले असून याच्या विरोधात विरोधकांनी त्यांच्या सरकारला ‘बरबादीचे एक वर्ष’ असे नाव दिले आहे. 112 पानांच्या या श्वेतपत्रिकेत त्यांनी म्हटले कि, बसवलेल्या सरकारच्या एक वर्षाच्या कालखंडात सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकारच्या धोरणांमुळे देश खड्ड्यात चालला आहे. त्याचबरोबर त्यांनी सत्ताधारी इम्रान खान यांच्या पक्षावर मुस्कटदाबी केल्याचा आरोप देखील केला आहे. देशात महागाईने सर्वोच्च स्थान गाठले असून एका वर्षाच्या आत पाकिस्तानी रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची घोषणा केली असून यामध्ये भारत सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –