इम्रान खान होमोसेक्सुअल,पत्नीचा धक्कादायक आरोप

काबुल : वृत्तसंस्था

इम्रान खान होमोसेक्सुअल आहे. असा आरोप त्याची घटस्फोटित पत्नी रेहम खान हिने केला आहे. रेहम खानने एक पुस्तक लिहिले असुन, त्यामध्ये तीने हा आरोप केला आहे. या पुस्तकाचे अजुन प्रकाशन बाकी आहे. इम्रान खानने क्रिकेट मधुन बाहेर पडल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. तेहरीक ए-इन्साफ हा त्यांचा राजकीय पक्ष आहे. मात्र इम्रान याची क्रिकेट अाणि राजकारणापेक्षा घटस्फोटांचीच चर्चा जास्त होताना दिसुन येते. यामध्ये आणखी भर म्हणुन इम्रान होमोसेक्सुअल असल्याचा धक्कादायक आरोप त्याच्या घटस्फोटीत पत्निने केला आहे. यामध्ये तेहरीक-ए-इन्साफच्या पुरुष सदस्यांसोबत संबंध आहेत असा आरोप रेहम खानने केला आहे.

या पुस्तकामुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पुस्ताकामधील उल्लेखात ‘माझे आणि इम्रानचे सेक्स रिलेशन कधीही चांगले नव्हते’ असे रेहम यांनी म्हटले आहे. तहरिक ए-खान च्या पुरुष सदस्यांसोबत इम्रान खानचे संबंध असल्याचेही म्हटले आहे. तसेच वसिम अक्रमवरही गंभीर आरोप केले आहेत. वसिम अक्रमने त्याच्या सेक्स संदर्भातल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडले होते. पुढे असाही उल्लेख केला आहे की, वसिम अक्रम त्याच्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करत असताना पाहात होता. यासंबंधी वसिमने रेहम ला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

दरम्यान या आरोपबाबत मुराद सईद यांनी ट्विटरद्वारे सांगिलते की, रहेम खान यांनी अत्यंत खालच्या शब्दात इम्रान खान यांच्यावर टिका केली. रेहम यांनी त्यांच्या पुस्तकात जे लिहीले आहे त्याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. मात्र त्यांची भाषा अशोभनीय आहे असे ट्विट मुराद सईद यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केले आहे.

दरम्यान हे पुस्तक प्रकाशित झाले तर मी रेहम खानवर केस करेन असे जेमिना गोल्डस्मिथ इम्रान खानची पहिली पत्नी हिने अशी प्रतिक्रिया दिली अाहे.