आत्ताच नको तर मी सांगितल्यावर ‘LoC’वर जा, इम्रान खान यांनी PoK मधील सभेत सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘काश्मीर आवर’नंतर इमरान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये शुक्रवारी एका मोठ्या कार्यक्रमात UNGA मध्ये काश्मीरचा मुद्दा परत उचलला. आर्थिक हितांमुळे मुस्लिस देशांनी या प्रकरणात पाकची साथ दिली नाही. इमरान यांवर बोलले की, मी संयुक्त राष्ट्र महासभे (UNGA) मध्ये काश्मीरचा मुद्दा उचलून जगाला यासंबंधित माहिती देईल. ते म्हणाले की काश्मीर मुद्यावर पाकिस्तानला मुस्लिम देशांचे समर्थन मिळाले नाही, कारण भारतबरोबर त्यांचे आर्थिक संबंध आहेत. परंतू मुस्लिम देश असलेले सव्वा अरब मुस्लिम हे पाहत आहेत.

इमरान खान म्हणाले की, मला माहिती आहे की तुमच्यातील अनेकांना LOC वर जाण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू आता मी तुम्हाला सांगत आहे की आता LOC वर जाण्याची गरज नाही. तुम्ही तेव्हा LOC वर जा जेव्हा मी सांगेल. ते पुढे म्हणाले की, पहिल्यांदा मला संयुक्त राष्ट्रात जाऊ दे, जगाला काश्मीर बद्दल सांगू दे, काश्मीरचा प्रश्न सुटला नाही तर याचा परिणाम संपूर्ण जागावर होईल.

पाक पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा तुम्ही भारतीय मुसलमानांना हा संदेश देऊ की भारतीय फक्त हिंदूंसाठी आहेत. ते म्हणाले की, हेच कारण आहे की मी जागतिक पातळीवरची भावडांना सांगत आहे की त्यांनी भारताच्या हिटलरला रोखावे. आज दुपारी त्यांनी नमाज नंतर मुजफ्फराबादच्या लोकांना या रॅलीत संबोधित केले.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर इमरान खान पाकमधील जनतेला भारताविरोधात भडकवत आहे. आपली आर्थिक स्तरावर असलेली परिस्थिती लपवण्यासाठी हा प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी आपल्या देशातील लोकांना आवाहन केले होते की, शुक्रवारी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान रस्त्यावर उतरा आणि काश्मीर प्रति एकजूट दाखवा. परंतू त्याचा या आवाहनाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काश्मीर आवरचा फंडा चालाला नसल्याने इमरान खानने यांनी सभा घेण्यास सुरुवात केली. इमरान यांचा POK च्या मुजफ्फराबादमधील हा तिसरा दौरा आहे.