पाकिस्तानचे PM इम्रान खान यांना अमेरिकेतील विमानतळावर नाही मिळाला ‘पाहुणचार’

वाशिंग्टन : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रविवारी अमेरिकेत पोहचले. ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहे. मात्र, त्याअगोदर वाशिंग्टन विमानतळावर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. एका देशाचे प्रमुख असतानाही त्यांचे विमानतळावर सरकारी स्वागत सत्कार केला गेला नाही. शेवटी त्यांना व त्यांच्याबरोबरच्या अधिकाऱ्यांना मेट्रोने हॉटेलपर्यंत जाण्याची वेळ आली.

इम्रान खान यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. अमेरिका आणि अफगान तालिबान यांच्यात निर्णायक वेळ आली आहे. ट्रम्प यांच्या काळात पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. ट्रम्प यांनी पाकिस्तानला वारंवार इशारा देऊन दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दहशतवाद्यांविरुद्धची लढाई, सैन्य मदतीत केलेली कपात या विषयांवर ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या चर्चा होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त-