इम्रान खानचं चाललं नाही काश्मीरचं कार्ड, ट्रम्प यांच्या ‘पंच’नं चा अपेक्षा ‘भंग’ ! जाणून घ्या ‘हे’ 5 मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र पाकिस्तानला प्रत्त्येक वेळी हारच पत्करावी लागत आहे. नुकतेच इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा अंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला मात्र इम्रान खान यांचा या प्रयत्न सुद्धा अयशस्वी झाला आहे कारण या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्या समोर नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याचे पहायला मिळाले.

न्यूयॉर्कमध्ये ज्यावेळी दोघेही पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी इम्रान खान यांनी अशा अनेक गोष्टीबद्दल बोलून दाखवले ज्या गोष्टींची पाकिस्तानला बऱ्याच दिवसांपासून चीड होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी खास त्यांच्या शैलीत सर्व पत्रकारांना उत्तरे दिली.

नेमकं काय म्हणाले ट्रम्प यावेळी

1. भारतासोबत खूप चांगले संबंध
ट्रम्प म्हणाले भारत अमेरिकेचे सगळे संबंध खूप चांगले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे कि पाकिस्तानसुद्धा सर्व ठीक करेल. मात्र हे समोर बसलेले व्यक्ती (सर्व पत्रकार) पाकिस्तानवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

2. कलम 370 बाबत मोदींचे केले कौतुक
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोर नरेंद्र मोदी यांची खूप स्तुती केली. ते म्हणाले मोदी यांनी हाउडी मोदी या कार्यक्रमातील कलम  370 बाबतचे भाषण खूपच आक्रमक होते. जमलेले सर्व लोक त्यांना अगदी लक्षपूर्वक ऐकत होते.

3. कोठून आणता असे पत्रकार ट्रम्प यांचा इम्रान यांना सवाल
भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना एका पाकिस्तानी पत्रकाराने काश्मीरच्या स्थिती बाबत विचारले त्यावर ट्रम्प यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवत इम्रान खान यांना विचारले ‘असे पत्रकार तुम्ही कोठून शोधून आणता’ ? ट्रम्प पत्रकाराला म्हणाले तुम्ही इम्रान खान यांच्या टीममध्ये आहेत अशा वेळेस तुमचे बोलणे एक प्रश्न नसून वक्तव्य वाटत आहे.

4.मध्यस्थी साठी तयार पण भारत तयार असेल तर
इम्रान खान यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याची विनंती केली मात्र ट्रम्प यांनी सांगितले की जर दोन देश एकत्र येण्यासाठी तयार असतील तर अमेरिका मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे परंतु भारताने याबाबत मंजुरी देणे गरजेचे आहे.

5. इस्लामिक दहशतवादाविरोधात लढाई
एक दिवसाआधी हाउडी मोदी या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला इस्लामिक दहशतवादाविरोधात लढायचे आहे आणि या लढाईसाठी ते भारतासोबत आहेत असे सांगितले होते तसेच सीमांबाबतच्या संबंधावर सुद्धा ते भारतासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी 9/11, 26/11 या हल्ल्यावर बोलताना पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केली होती.

Visit : Policenama.com