PM मोदींच्या प्लॅनिंगमुळं गडबडले ‘पाक’चे PM इम्रान खान, PoK ला पाकिस्तानशी जोडण्याचं गुप्त ‘कारस्थान’

पोलीसनामा ऑनलाईन : भारताकडून सतत आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा सामना करत असलेला पाकिस्तान आता नवा युक्तिवाद करण्याचा तयारीत आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे त्रस्त असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना गुप्तपणे पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) चा पाकिस्तानमध्ये समावेश करण्याची इच्छा आहे. हा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे नसीर अझीझ खान यांनी केला आहे.

या संदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘आझाद जम्मू-काश्मीर मॅनेजमेंट ग्रुप’ चे नाव बदलून ‘जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवा’ असे ठेवले आहे. ११ डिसेंबर रोजी याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

ते शेवटचे पंतप्रधान होऊ शकतात :
इम्रान खानच्या या कारवाईच्या काही दिवस आधी पीओके पंतप्रधान फारूक हैदर खान म्हणाले की, ते पीओकेचे शेवटचे पंतप्रधान होऊ शकतात. पीसीकेची स्थिती बदलण्यासाठी कायदेशीर आधार तयार करण्याच्या सूचना इम्रानने संबंधित विभागांना दिल्या आहेत, असा दावा नासिर अझीझ यांनी केला आहे.

पीओके- गिलगिट-बाल्टिस्तानच्या विलीनीकरणाचीही तयारी :
पीओके-गिलगिट-बाल्टिस्तानच्या विलीनीकरणाचीही तयारी सुरू असल्याचा दावा नसीर अझीझ यांनी केला आहे. तेही गुप्तपणे. यासाठी घटनात्मक दुरुस्तीची तयारीही सुरू आहे. असेही होऊ शकते की संपूर्ण गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेश पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आणला जाऊ शकेल. तसेच नसीर अझीझ खान यांच्या मते, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पीओकेचे बेकायदेशीरपणे विलीनीकरण केले जाऊ शकते. इम्रान खानच्या या निर्णयावर पीओकेचे लोक आक्षेप घेत आहेत.

मानवाधिकारांचे उल्लंघन भीती :
पाकिस्तान पीओके- गिलगिट-बाल्टिस्तान या तिन्ही ठिकाणी दडपशाहीचे पाऊल उचलत आहेत. आता इम्रान खानच्या या निर्णयालाही विरोध केला जात आहे. पीओके-गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तान सरकार मानवाधिकारांचे उल्लंघन करू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच पीओके- गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये स्वायत्तता मिळविणार्‍या १०० हून अधिक लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

भारत सरकारच्या धमक्यांमुळे पाकिस्तानमध्ये भीती :
जम्मू-काश्मीरची भारतातील विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर इम्रान खानने हे पाऊल उचलत आहेत. मोदी सरकारने अनेक वेळा पीओके मागे घेण्याचा इशारा दिला आहे.

पीओकेला पाचवा प्रांत म्हणून घोषित करण्याची शक्यता :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पीओकेला देशातील पाचवे प्रांत म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याचे सहकारी फिरदौस आशिक अवान म्हणाले की, आझाद जम्मू-काश्मीर मॅनेजमेंट ग्रुपचे नाव बदलण्याला पीओकेच्या दर्जेचा काहीही संबंध नाही.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/