पाकिस्तान तर सोडाच पण स्वतःची खुर्ची देखील सांभाळू शकत नाहीत इम्रान खान, सरकार पडणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर भारताविरोधात प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यानंतर आता इमरान खान यांच्यावर पाकिस्तानातूनच टीका होण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक परिस्थितीकडे लक्ष न देता इतर मुद्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न इमरान खान यांच्याकडून करण्यात आला परंतू आता इमरान खान सरकारच धोक्यात आले आहे.

पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांनी भारतीय वृत्तपत्रासाठी लिहिले की इमरान खान यांच्यासाठी येणारे दोन महिने अत्यंत धोकादायक असणार आहे. तेथे त्यांना आपले सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. मीर म्हणाले की देशातील गंभीर परिस्थिती आणि अंतर्गत समस्या यापासून लक्ष विचलित करण्यासाठी इमरान खान काश्मीरचा मुद्दा आणि मोदी यांच्या विरोधात वक्यव्य करत आहेत.

या कारणाने इमरान खान यांचे सरकार कोसळण्याची शक्यता
मीर यांनी लेखात सरकार पडण्याच्या शक्यतेचे कारण सांगताना सांगितले की इमरान खान यांची काश्मीरमुद्द्यावरुन त्यांच्याच देशातून टीका होत आहे. ते बलुचिस्तान नॅशनल पार्टीच्या मदतीने पकिस्तानात सरकार चालवत आहे आणि हाच पक्ष 5000 बेपत्ता लोकांना शोधण्यावरुन इमरान खान सरकारवर दबाव टाकत आहे. परंतू इमरान खान यांना यात यश आले नाही.

यामुळे हा पक्ष इमरान खान सरकारला देत असलेले समर्थन काढून घेऊ शकते. एवढेच नाही तर बीएनपी पक्षाचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी इमरान खान यांच्या विरोधात आंदोलन काढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी विरोध पक्ष नेता नवाज शरीफ यांची देखील भेट घेतली आहे. पीएनबीच्या या बंदाला शरीफ यांचा पाठिंबा आहे.

इमरान खान यांच्या समोर दुसरा पेच आहे तो पाकिस्तानी सैन्याचा. इमरान खान यांच्यासमोर वाढत असलेल्या समस्या आणि देशाची मलीन होत असलेली प्रतिमा याचा विचार करुन देशातील पाकिस्तानी सैन्याने इमरान खान यांचे समर्थन नाकारले आहे. इमरान खान हे तालिबानचा अमेरिकेशी करार करु शकले नाहीत, त्यामुळे त्याचे सरकार कोसण्याची शक्यता दुप्पट झाली आहे. पाक आणि अमेरिकेला आशा आहेत की लवकरच तालिबानशी करार होईल परंतू त्यात त्यांना अजून यश आले नाही.